मच्छीमारांना नुकसानीपोटी सुमारे एक लाखाची मदत

संरक्षित समुद्री कासवांना जीवदान देताना जाळ्यांचे नुकसान
Fisherman
FishermanAgrowon

रत्नागिरी ः मच्छीमारांच्या (Fisherman) जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांना जीवदान देताना जाळ्यांचे नुकसान झालेल्या मच्छीमारांना कांदळवन कक्षामार्फत मदत दिली जाते. यंदाच्या वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ कासवांना मच्छीमारांनी जीवनदान दिले आहे. त्या मच्छीमारांना नुकसानीपोटी एक लाखाची मदत वितरित करण्यात आली आहे.

मच्छीमारांच्या जाळ्यात सापडून कासव, डॉल्फिन व अन्य संरक्षित जातींचा मृत्यू होतो. गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे ग्रीन सी टर्टल, हॉकबील सी टर्टल, ऑलिव्ह रिडले टर्टल या कासवांची संख्या कमी होत आहे.

त्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जागतिक पातळीवर पावले उचलण्यात आली आहेत. भारतामध्येही या कासवांना संरक्षित दर्जा देण्यात आलेला आहे; परंतु अनेकवेळा मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये ही कासवे अडकतात. जाळ्यात अडकलेल्या कासवांना सोडवताना, जाळ्यांचे नुकसान होते. त्यामुळे मच्छीमारही अनेकदा जाळ्यातून बाहेर काढण्याकडे दुर्लक्ष करतात. मच्छीमारांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम वनविभाग व कांदळवन कक्षामार्फत सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com