Heavy Rain : अतिवृष्टीमुळे पाच मंडलातील १९ हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

वसमत तालुक्यातील स्थिती; १४ हजार ९०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, १६२ जनावरे दगावली
Crop Damage
Crop DamageAgrowon

हिंगोली ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.८) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, बाभूळगाव, आंबा, हयातनगर या पाच महसूल मंडळामधील १९ हजार १९७ शेतकऱ्यांच्या १४ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे १६२ जनावरे दगावल्याचा अंदाज आहे. पूरग्रस्त गावातील १६३ घरांची पडझड झाली असून पुराचे शिरून १ हजार १९६ घरांचे नुकसान झाले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) यांनी दिली.

Crop Damage
Crop Damage: अतिवृष्टीमुळे पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नुकसानीचा प्राथमिक अंदाजानुसार कुरुंदा या महसूल मंडळातील ६ हजार ८४० शेतकऱ्यांचे ५ हजार ३३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण ९३ जनावरे दगावली.पडझड झालेली घरे १४० असून पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या घरांची संख्या १ हजार १३५ एवढी आहे. गिरगाव महसूल मंडळातील ८ हजार १३२ शेतकऱ्यांचे ६ हजार ४८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दगावलेल्या जनावरांची संख्या ६९ आहे.पडझड झालेली घरे १८ आणि पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या घरांची संख्या ६१ आहे.

Crop Damage
Crop Damage: अतिवृष्टीमुळे पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

बाभूळगाव महसूल मंडळातील ३ हजार ४९५ शेतकऱ्यांचे २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पडझड झालेल्या घरांची संख्या २ आहे. आंबा महसूल मंडळातील ७०५ शेतकऱ्यांचे ६०४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हयातनगर महसूल मंडळातील २५ शेतकऱ्यांचे २० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पडझड झालेल्या घरांची संख्या ३ आहे. नुकसानीचा अंदाज हा प्राथमिक असून यामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.

मंडलनिहाय पीक नुकसान क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

मंडल...शेतकरी संख्या...बाधित क्षेत्र

कुरुंदा...६८४०...५३३२

गिरगाव...८१३२...६४८७

बाभूळगाव...३४९५...२४६५

आंबा...७०५...६०४

हयातनगर...२५...२०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com