निविष्ठा भरपूर; पण पेरण्यांची घाई नको

कृषिमंत्री दादा भुसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
निविष्ठा भरपूर; पण पेरण्यांची घाई नको
Dada BhuseAgrowon

पुणे ः ‘‘राज्यात खते, बियाणे मुबलक असून टंचाई (Fertilizer Shortage) जाणवणार नाही. मात्र, पाऊस (Rain) काहीसा लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे घाई न करता शेतकऱ्यांनी पुरेसा पडल्यानंतरच पेरा करावा,’’ असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

पुणे कृषी महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी खरीप हंगामाच्या स्थितीची माहिती दिली. ‘‘राज्यात गेल्या वर्षी याच कालावधीत पेरा तीन टक्क्यांपर्यंत झाला होता. यंदा आतापर्यंत दीड टक्का पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी अनुभवी असून पुरेसा पाऊस पडल्याशिवाय ते पेरणी करीत नाहीत. मात्र, ७० ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. तसा सल्ला कृषी विभागाने जारी केलेला आहे,’’ असे ते म्हणाले.

‘‘खरिपाच्या पूर्वतयारीचा मी स्वतः प्रत्येक विभागात आढावा घेतला आहे. आम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की, राज्यात बियाणे, खते व इतर निविष्ठा पुरेशा आहेत. जिल्हानिहाय योग्य नियोजन करण्यात आलेले आहे. कुठेही निविष्ठांची कमतरता पडणार नाही. सध्या पाऊस लांबणीवर पडला असला तरी पुढील तीन-चार दिवसांत पावसाचे आगमन झाल्यास नियोजनात अडचण येणार नाही,’’ असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘‘कापूस व सोयाबीन या दोन मुख्य पिकांच्या उत्पादनवाढीसाठी अर्थसंकल्पात यंदा स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. त्याद्वारे या पिकांचे १०० हेक्टरचे समूह तयार केले जातील. असे एक हजार समूह एकत्र केले जातील. त्यातील शेतकऱ्यांना मशागत ते काढणीपर्यंत मार्गदर्शन पुरविले जाईल,’’ असे कृषिमंत्री म्हणाले. राज्यात यंदा सोयाबीन बियाण्यांची टंचाई नाही. मात्र, महाराष्ट्र राज्य ‘सीड हब’ होण्यासाठी महाबीजला सूचना देण्यात आल्या आहेत, असे उत्तर त्यांनी एका प्रश्नाला दिले.

कृषिमंत्री म्हणाले...

- सोयाबीन बियाणे उगवणक्षमतेची चाचणी प्रात्यक्षिके सुरू

- ‘बीड पॅटर्न’च्या धर्तीवर पीकविम्याच्या निविदा जारी

- विमा कंपन्यांचा नफ्याला १० टक्क्यांपर्यंत मर्यादा येणार

- पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना बंद केलेली नाही

- फळबाग लागवडीसाठी ‘रोहयो’तून शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com