Rain Update : चास-कमान धरण परिसरात पाऊस रुसलेलाच

राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस, तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असताना चास-कमान धरण व परिसरात पाऊस रुसलेला असल्याची परिस्थिती आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

चास, ता. खेड ः तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चास-कमान धरण (Chas Kaman Dam) (ता. खेड) व परिसरात पाऊस (Low Rainfall) रुसलेलाच असून, धरणात नऊ जुलैपर्यंत एकूण १३.७६ टक्के (१.०४ टीएमसी) पाणीसाठा (Water Stock) झाला आहे. रिमझिम पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कासवाच्या गतीने वाढ होत असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास पाच टक्क्यांनी कमी आहे. पावसाचे सरासरी प्रमाणही मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Rain Update
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस, तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असताना चास-कमान धरण व परिसरात पाऊस रुसलेला असल्याची परिस्थिती आहे. रिमझिम व संथ गतीने पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत नाही अशी स्थिती आहे. ८.५ टीएमसी पाणीसाठा क्षमतेचे हे धरण प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात तुडुंब भरते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे कमी होत चाललेले असल्याने धरण भरण्यास ऑगष्ट महिना उजाडतो आहे.

मागील वर्षी ९ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा १९.१५ टक्के होता, तर ४ ऑगस्ट रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. चालू वर्षी ९ जुलै रोजी धरणात १३.७६ टक्के पाणीसाठा झाला असून, एक जूनपासून धरण क्षेत्रात १४९ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा अनिश्चिततेचा खेळ सुरूच असून, धरण कधी भरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. धरण भरल्यास रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांवर तरी बळीराजा आपले लक्ष केंद्रित करू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com