Lumpy skin : लम्पी स्कीन’ आजाराने ५११ गावे बाधित घोषित

जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वरचेवर वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २९५ गावांचा परिसर बाधित म्हणून घोषित झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

जिल्ह्यात लम्पी स्कीनचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वरचेवर वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २९५ गावांचा परिसर बाधित म्हणून घोषित झाला आहे. या गावांच्या शिवारातून जनावरे, वैरण वाहतूक, खरेदी-विक्री बंद आहे. आतापर्यंत १ लाख ६० हजार जनावरांचे लसीकरण (Animal Vaccination) केले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी’ नियंत्रणासाठी एक लाख लस मात्रा

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने प्रादुर्भावग्रस्त भागांत लसीकरण सुरू केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जनावरांचे आठवडी बाजार, पशुप्रदर्शने, जनावरांची व वैरणीची वाहतूक बंद केली.

Lumpy Skin
Lumpy Skin : वाशीम जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीसह गुरांचे बाजार बंद

श्रीरामपूर तालुक्यातील २९ गावे, नेवासा तालुक्यातील ३३ गावे, संगमनेरमधील १२३ गावे, पाथर्डीतील ३२ गावे, जामखेडमधील २२ गावे, राहातामधील ४० गावे, कर्जतमधील १९ गावे, राहुरीतील १५ गावे, श्रीगोंदामधील ३७ गावे, पारनेर मधील ४१ गावे, अकोलेतील ६१ गावे, कोपरगावमधील १४ गावे, शेवगावमधील १७ गावे व नगरमधील २८ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

२ लाख ४० हजार जनावरांचे लसीकरण जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत आहे. अकोले, श्रीरामपूरमध्ये प्रादुर्भाव आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले. जिल्ह्यात २०९ जनावरे प्रादुर्भावग्रस्त आहेत. तर २५८ गावांत ३ लाख ४१ हजार जनावरे आहेत. त्यातील २ लाख ४० हजार जनावरांचे लसीकरण केले आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजयकुमार कुमकर यांनी ही माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com