Lumpy Skin : यवतमाळ जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणाबाहेर

जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढल्याने पशुपालक हवालदिल
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

यवतमाळ : लम्पी स्कीन चर्म आजाराचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून केला जात असला, तरी याची तीव्रता वाढत असल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : लम्पी स्कीन ’मुळे बीड जिल्ह्यात ८४ जनावरांचा मृत्यू

गोट पॉक्स लसीकरणानंतर राज्यात ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणात आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून केला जात होता. मात्र पशुसंवर्धन विभागाचा हे सारे दावे फोल ठरले आहेत. लम्पी स्कीन विषाणूमध्ये सातत्याने बदल होत असल्याने त्यानुसार महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला उपचार पद्धतीत देखील बदलाची शिफारस करावी लागत आहे. माफसूच्या सूचनानुसार उपचार पद्धतीवर भर दिला जात आहे. मात्र त्यानंतर देखील लम्पी स्कीन आजार नियंत्रणात येत नसल्याचे वास्तव आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : गडचिरोली जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव

यवतमाळ जिल्ह्यात पशुवैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जनावरांवर उपचार करीत असून, माफसूच्या तीन टीम दाखल झाल्या आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आजार नियंत्रणाचे प्रयत्न होत आहेत. मात्र आतापर्यंत २९० गावे कवेत घेतली आहेत. या ठिकाणची १७ हजार ३०३ जनावरे बाधित झाली आहेत. यातील १३,१३५ जनावरे बरी झाली. ३०८ जनावरे गंभीर आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८९ बैल दगावले आहेत, तर १७६ गाईंचा मृत्यू झाला आहे. १५६ वासरांचा मृत्यू झाला असून, बैल दगावल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com