Pandharpur Yatra : पंढरीत आज माघीवारीचा सोहळा

माघ वारीचा सोहळा बुधवारी (ता. १) पंढरपुरात साजरा होत असून, या वारीत सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
Pandharpu
PandharpuAgrowon

पंढरपूर, जि. सोलापूर ः माघ वारीचा (Maghi Wari Pandharpur) सोहळा बुधवारी (ता. १) पंढरपुरात (Pandharpur Yatra) साजरा होत असून, या वारीत सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

एकीकडे अनेक दिंड्या, पालख्या मंगळवारी (ता. ३१) पंढरीत दिवसभर दाखल होत राहिल्या. तर दुसरीकडे टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेल्याचे चित्र राहिले.

पंढरीत वर्षातील चार महत्त्वाच्या वाऱ्यांपैकी एक माघ वारी गणली जाते. माघी एकादशीला जया एकादशी असेही संबोधले जाते. मागच्यावर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे वारीवर परिणाम झाला होता. पण यंदा पूर्ण क्षमतेने ही वारी भरली जात आहे. मंगळवारपर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.

Pandharpu
Pandharpur : बंधुत्वाचा संदेशाने पंढरपूर-घुमान नाते पुन्हा तयार होणार

या वारीला सोलापूरची वारी म्हणूनही गणले जाते. त्यामुळे या वारीत जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या दिंड्या आणि पालखी सोहळे सर्वाधिक पंढरीत येतात. त्याशिवाय कोकण आणि मराठवाड्यातूनही दिंड्या पंढरीत येतात. गेल्या दोन दिवसांपासून वारकऱ्यांची रीघ पंढरीत सुरू आहे.

Pandharpu
Pandharpur Wari : विठ्ठलाच्या नामघोषात भान हरवलेली वारकरी

पंढरीतील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचने सुरू आहेत. मंगळवारी दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने चंद्रभागा तिरी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याशिवाय विठ्ठल मंदिराचा परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता या भागातही वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

मंगळवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यालगतच्या पाच नंबरच्या पत्राशेडच्याही पुढे गेली. दर्शनासाठी सुमारे आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो आहे. दरम्यान, माघी वारीसाठी मंदिर समिती, नगरपालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह विविध सोई पुरवण्यात येत आहेत. वारकऱ्यांच्या मदत आणि सुरक्षेसाठी नियंत्रणकक्षही उभारण्यात आले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com