Mahamorcha : महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला महामोर्चा

राज्य सरकारने घेतलेल्या बोटचेपी भूमिकेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार
महाविकास आघाडी सरकारAgrowon

बाबत राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते आणि नेत्यांकडून वारंवार होत असलेली अवमानजनक वक्तव्ये, सीमा भागातील गावांनी अन्य राज्यांत जाण्याचा घेतलेला पवित्रा अशावेळी राज्य सरकारने घेतलेल्या बोटचेपी भूमिकेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली.

सोमवारी (ता. ५) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीनंतर रात्री पत्रकार परिषदेत मोर्चाची घोषणा केली. विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या बाबत ठाकरे म्हणाले, ‘‘सीमावाद हा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, सीमेवरील गावे कर्नाटक, गुजरात आणि अन्य सीमेलगतच्या राज्यांमध्ये जातो, असे कधी म्हणाली नाहीत. मात्र, जत, नंदूरबार आणि अन्य ठिकाणची गावे तशी मागणी करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री धमकी देत असताना आपले मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसतात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. या सगळ्यासह महागाई आणि बेरोजगारीविरोधात आम्ही मोर्चातून तोंड फोडणार आहोत.’’

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने याविरोधातील राग मोर्चातून व्यक्त होईल. राज्यपालांनी संतापजनक वक्तव्य करूनही त्यांना हटविले जात नाही. ’’

जमत नसेल तर

सांगा, सरकार चालवू’

सीमावासीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बेळगावात जाणारे मंत्री घाबरून दौरा रद्द करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर, विरोधी पक्ष बेळगावला जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर सरकारने आपल्याला जमत नाही म्हणून सांगावे आम्ही बेळगावला तर जाऊच, शिवाय सरकारही चालवून दाखवू.’ असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com