Maharashtra-Gujarat border : सुरगाणा तालुक्यातील गावे गुजरातमध्ये घ्या

सीमा संघर्ष समितीतर्फे वासदाच्या तहसीलदारांना निवेदन
Maharashtra-Gujarat border
Maharashtra-Gujarat borderAgrowon

पळसण, ता. सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र- गुजरात सीमावर्ती (Maharashtra-Gujarat border) भागांतील गावे, वाडे, पाडे गुजरात राज्यामध्ये सामील करून घ्यावीत, अशी मागणी सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीने (Surgana Taluka Seema Sangharsh Samiti) केली. या बाबत सोमवारी (ता.५) संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने वासदा (जि. डांग, गुजरात) येथील तहसीलदारांना लेखी निवेदन दिले.

Maharashtra-Gujarat border
Maharashtra Border : कर्नाटकच्या दाव्यानंतर ‘तुबची’चे पाणी महाराष्ट्रात

सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील गाव व पाडे गेल्या अनेक वर्षांपासून अविकसित असल्याने ही सर्व गावे गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी काही नागरिकांनी केली. त्यानंतर चिंतामण गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीची स्थापना केली. त्यानंतर वासदा तहसीलदारांना समितीने निवेदन दिले. दरम्यान, सोमवारी (ता. ५) जिल्हाधिकारी गंगाथरण. डी यांनी सुरगाणा तहसिल कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेत अडी-अडचणींचा आढावा घेतला.

सीमा संघर्ष समितीची मागणी गुजरात सरकारपर्यंत पोहोचवू. निर्णय गुजरात सरकार घेईल.

- मनसुख वसावा, तहसीलदार,वासदा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com