Sugar Production Update : साखर उत्पादनात महाराष्ट्र तर उताऱ्यात गुजरात प्रथम

महाराष्‍ट्रातला हंगाम पूर्णपणे संपला आहे. उत्‍तर प्रदेशात अजूनही ३८ साखर कारखाने सुरू आहेत. सध्‍या उत्‍तर प्रदेशात १०१ लाख टन साखर उत्पादित झाली आहे
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur Sugar Production : देशातील साखर कारखान्यांनी एप्रिलअखेर ३२० लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे. अजूनही साखर कारखाने सुरू असल्‍याने साखर उत्पादनात आणखी ७ लाख टनांची भर पडू शकते, असा अंदाज आहे.

साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. या खालोखाल हरियाना, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

महाराष्‍ट्रातला हंगाम पूर्णपणे संपला आहे. उत्‍तर प्रदेशात अजूनही ३८ साखर कारखाने सुरू आहेत. सध्‍या उत्‍तर प्रदेशात १०१ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.

हंगाम संपेपर्यंत उत्‍तर प्रदेशचे उत्पादन महाराष्ट्राइतका होण्‍याचा अंदाज आहे. देशातील ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.

कर्नाटकात ५५.५०, तमिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरियानात ७.१५, पंजाबमध्ये ६.६५, बिहारमध्‍ये ६.४० लाख टन उत्पादन झाले आहे.

या राज्यांशिवाय मध्य प्रदेशात ५, उत्तराखंडमध्ये ४.७५, तेलंगणात २.८०, आंध्र प्रदेशात २.३० व उर्वरित राज्यात १.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Sugar Production
Sugar Production : कोल्हापूर विभाग साखर उताऱ्यात आघाडीवर


देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये १०.८० टक्के आहे. त्या खालोखाल कर्नाटका १०.१०, तेलंगणा १०.१०, महाराष्ट्र १०, आंध्र प्रदेश ९.७०, बिहार ९.७० व उत्तर प्रदेश ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमाक आहे.

एप्रिल अखेर देशात उसाचे सर्वाधिक गाळप उत्तर प्रदेशात १०५५.९६ लाख टन इतके झाले आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रात १०५३ लाख टन गाळप झाले आहे. व कर्नाटकाचा ५४९.५० लाख टन गाळप झाले आहे.

सध्याच्या गाळपाचा वेग लक्षात घेता देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिन्याअखेर चालेल. त्यातून सुमारे ३२७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त सुमारे ४५ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी होईल, अशी शक्यता आहे.
- जयप्रकाश दांडेगावकर,
अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com