Mahatma Jotirao Phule Farmers' Debt Relief Scheme-2019
Mahatma Jotirao Phule Farmers' Debt Relief Scheme-2019Agrowon

दुसऱ्या यादीत औरंगाबादमधील २१ हजार लाभार्थ्यांचा समावेश

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेत पात्र असलेल्या शेतकन्यांची विशिष्ट क्रमांकासह दुसरी यादी २४ डिसेंबरला प्रसिद्ध झाली आहे.

औरंगाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ (Mahatma Jotirao Phule Farmers' Debt Relief Scheme-2019) अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेत पात्र असलेल्या शेतकन्यांची विशिष्ट क्रमांकासह दुसरी यादी २४ डिसेंबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २१२४३ लाभार्थ्यांच्या समावेश असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासननिर्णय निर्गमित केलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीय व खासगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरलेली आहे.

 Mahatma Jotirao Phule Farmers' Debt Relief Scheme-2019
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

बँकेच्या व संस्थांच्या गटसचिवांच्या माध्यमातून सदरील याद्या गावतील सर्व बँके शाखेत, सीएससी व आपले सरकार सेवा केंद्र, विका सेवा सहकारी संस्था, सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २१२४३ विशिष्ट क्रमांकासह (व्ही- के लिस्ट) पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्याचे आधार प्रमाणिकरण संबंधित लाभार्थ्याने संबंधीत बँक शाखेत, सीएससी व आपले सरकार सेवा केंद्रावर मूळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेऊन जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याची सूचनाही श्री. दाबशेडे यांनी केली आहे.

विशिष्ट क्रमांकासहची यादी संबंधित बँका, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच तालुका सहायक निबंधक कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे. शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकन्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, अशा प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी समिती यांच्या तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. जास्तीत जास्त संबंधित शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये तातडीने जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी केले आहे.

 Mahatma Jotirao Phule Farmers' Debt Relief Scheme-2019
PM Kisan: शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रूपयांचे वाटप

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com