APMC Election : मेहकर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी रिंगणात

जिल्ह्यातील प्रतिष्ठेची व सर्वांचे लक्ष्य वेधलेली मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे तयार झाली आहेत.
APMC Election
APMC ElectionAgrowon

Buldana News : जिल्ह्यातील प्रतिष्ठेची व सर्वांचे लक्ष्य वेधलेली मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे तयार झाली आहेत. खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली या कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण गेल्या २७ वर्षांपासून एकछत्री अंमलासारखे सुरू होते.

परंतु शिंदे गट वेगळा झाल्याने व खासदार, आमदार तिकडे गेल्याने त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रित येत मैदानात एन्ट्री घेतली आहे. यामुळे निवडणुकीचा रंग वाढला आहे.

१९९५ पासून तब्बल २७ वर्षे प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांच्या नेतृवात बाजार समिती व खरेदी विक्री संस्था कार्यरत आहेत. ते ठरवतील तेच लोक संचालक होत आले.

या संस्थांची निवडणूक कधी झाली, हे कुणाला कळतही नव्हते, अशी स्थिती होती. परंतु खासदार जाधव, आमदार रायमूलकर हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने यावेळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष हे ताकदीने उतरले असल्याचे चित्र आहे.

APMC Election
Mumbai Apmc : रमजानमुळे फळबाजारात चांगला उठाव

१८ संचालकांच्या जागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी २० एप्रिल या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर कितीजण मैदानात राहतात ते स्पष्ट होईल. नेहमी बिनविरोध करून घेतल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यावेळी मात्र चित्र बदलले असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

APMC Election
Jalgaon APMC Election : कार्यकर्त्यांचे अर्ज माघारी घेण्यासंबंधी नेत्यांची दमछाक

त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रा.आशीष रहाटे, प्रा. सतीश ताजने यांच्यासह महाविकास आघाडीतील काही जणांच्या उमेदवारीवर विरोधी गटाने आक्षेप घेतल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे.

वातावरण अशा गोष्टींमुळे आणखीच तापत आहे. प्रमुख उमेदवार रिंगणात राहू नये यासाठी विरोधी गटाकडून व्यूहरचना करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

तथापि खासदार जाधव आणि आमदार रायमूलकर यांनी मेळावा घेऊन बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या निवडणुका एकहाती जिंकू ,असा विश्वास कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.

आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचे भवितव्य काय ठरते आणि उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत किती जण उमेदवारी मागे घेतात, त्यावरही बरीच गणिते अवलंबून दिसत आहेत. महाविकास आघाडी ताकदीने निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगत वाढली एवढे मात्र खरे.

खासदार जाधव यांचे निकटचे स्नेही व राजकीय खंदे नेते माजी सभापती ॲड.सुरेशराव वानखेडे हे महाविकास आघाडीत सामील झाल्याने चित्र काय बदल होतात हेही निकालानंतर स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com