APMC Election Parbhani : ‘महाविकास’ला चार, तर युतीला दोन बाजार समित्यांत बहुमत

परभणी जिल्ह्यातील ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची शनिवारी (ता. २९) मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले.
APMC Election Parbhani
APMC Election Parbhani Agrowon

APMC Election Parbhani परभणी जिल्ह्यातील ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची शनिवारी (ता. २९) मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले.

परभणी, सेलू, गंगाखेड, पुर्णा या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीप्रणीत पॅनेलला बहुमत मिळाले, तर जिंतूर व बोरी या २ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजप युतीप्रणीत पॅनेला बहुमत मिळाले आहे.

ताडकळस बाजार समितीत महाविकास आघाडी व भाजप युतीला पॅनेलला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या आहेत. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीप्रणीत जय नृसिंह शेतकरी विकास पॅनेलने १२ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले.

भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस युती पॅनेलला ४ जागांवर समाधान मानावे लागले.

APMC Election Parbhani
APMC Election In Marathwada : मराठवाड्यात अनेक प्रस्थापितांना धोबीपछाड

अपक्ष उमेदवार २ जागांवर विजयी झाले. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनेलने १४ जागा जिंकत बहुमत मिळविले. महाविकास आघाडीप्रणीत पॅनेलला ४ जागांवर विजय मिळाला. बोरी कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या भारतीय जनता पक्षप्रणीत पॅनेलने १२ जागा मिळवत बहुमत प्राप्त केले. महाविकास आघाडीप्रणीत ६ जागांवर विजय मिळाला.

APMC Election Parbhani
APMC Election Maharashtra : बाजार समित्यांवर ‘मविआ’चे वर्चस्व!

सेलू बाजार समितीत महाविकास आघाडीप्रणीत पॅनेलने १० जागा जिंकत बहुमत प्राप्त केले. भाजपप्रणीत पॅनेलला ६ जागा मिळाल्या, तर २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीला ११ व रासपप्रणीत ७ जागा मिळाल्या. पूर्णा बाजार समिती महाविकास आघाडी पॅनेलला १५ जागा‌ मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. रासपा व भाजपा युतीला ३ जागा मिळाल्या. ताडकळस बाजार कृषी उत्पन्न भाजप युतीप्रणीत पॅनेल ९ व महाविकास आघाडीला ९ अशा समान जागा मिळाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com