वीजहानी कमी करण्यासाठी महावितरणची मोहीम

सध्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲक्शन मोडवर येत महावितरणने मोहीम हाती घेतली आहे.
Electricity
ElectricityAgrowon

औरंगाबाद : सध्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी (Power Loss) असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲक्शन मोडवर येत महावितरणने (MSEDCL) मोहीम हाती घेतली आहे.

Electricity
Electricity : वीज ग्राहकांवरील बोजा रद्द करा ः प्रताप होगाडे

सध्या महावितरणच्या १६ परिमंडलांतील २३० पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसविणे, कपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे इत्यादी कामे करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कळविले आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे वीजहानी कमी करण्याचे आहे. त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे.

Electricity
Electricity : वीज देयके वसुलीसाठी साखर कारखान्यांवर नाही सक्ती

ही योजना जलदगतीने राबविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा मिळावी व त्यातून महावितरणची आर्थिक परिस्थिती उंचवावी यासाठी वीजहानी कमी होणे आवश्यक आहे, त्यासाठी महावितरणने योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या आहेत.

तांत्रिक हानी कमी करण्याचे उद्दिष्ट

जुनी झालेली पायाभूत सुविधा व उपकरणे, लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या, वीजभाराचे असंतुलन, उपकेंद्रांपासून दूर अंतरावर वितरण रोहित्र उभारणे, अतिभारीत वीजवाहिन्या आणि कमी दाबाचा वीजपुरवठा अशी विविध कारणे तांत्रिक हानी वाढण्यास कारणीभूत असून, ही हानी कमी करण्यासाठी जुन्या वीजवाहिन्या व केबल बदलविणे, वीज वाहिन्यांचे विलगीकरण करणे, वितरण रोहित्रावरील प्रतिक्रियाशील ऊर्जा (रिॲक्टिव्ह पॉवर) नियंत्रित करणे आणि उच्चदर्जाचे वितरण रोहित्र वापरून तांत्रिक हानी कमी करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून साध्य करण्यात येईल, असे श्री सिंघल यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com