Electricity : सेवा पंधरवाड्यात महावितरणने दिल्या ५८ हजारांवर नवीन वीजजोडण्या

प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढत या उपक्रमाचे शंभर टक्के उद्दिष्टही साध्य केले आहे.
Electric Grid
Electric GridAgrowon

सोलापूर : सेवा पंधरवड्यात महावितरणने (MSEDCL) विशेष कामगिरी बजावत केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या (Electricity Connection) दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या

Electric Grid
Free Electricity : मोफत वीजेसाठी दीड लाख कोटी लागतील

वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढत या उपक्रमाचे शंभर टक्के उद्दिष्टही साध्य केले आहे. या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे

Electric Grid
Free Electricity: देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ

या प्रकारच्या तक्रारींचे निवारण या पंधरवड्यात करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली.

नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

क्षेत्रीय स्तरावर पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या ५८ हजार ४५७ नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सेवा पंधरवाड्यात सर्व ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देऊन १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com