महिंदा राजपक्ष यांना देशाबाहेर जाण्यास मनाई

सध्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा महिंदा राजपक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतात पळून गेल्याची अफवा पसरली होती.
Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisAgrowon

कोलंबो, श्रीलंका (वृत्तसंस्था) ः सध्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा महिंदा राजपक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतात पळून गेल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्याकडून या अफवेचे खंडन करतानाच महिंदा राजपक्ष श्रीलंकेच्या नौदलाच्या त्रिंकोमाली तळावर कुटुंबीयांसह सुरक्षित असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राजपक्ष यांना देशाबाहेर जाण्यास स्थानिक न्यायालयाने मनाई केली आहे.

महिंदा राजपक्ष यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री नमल राजपक्ष, जॉन्सन फर्नांडो, पवित्रा वन्नीआराच्ची, सी. बी. रत्नायके, सनथ निशांथा आणि संजीवा एदिरीमान्ने यांच्यावरही देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे माध्यमांतील सूत्रांनी सांगितले. श्रीलंकेचे अटर्नी जनरल यांनी यासंदर्भात बार असोसिएशनच्या पाठिंब्याने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. या वेळी फोर्ट मॅजिस्ट्रेट यांनी या अर्जानुसार राजपक्ष यांना देश सोडून जाण्यास मनाई केली.

सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांवर हल्ले करण्यात आले होते, या हल्ल्यांमुळे व्यथित झालेल्या पक्षांच्या वतीनेही अर्ज दाखल करण्यात आला होता. श्रीलंकेतील सत्ताधारी श्रीलंका पोदूजना पेरामुना या पक्षाच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर कोलंबोतील टेम्पल ट्रीज आणि गॅले फेस ग्रीन येथे सोमवारी (ता. ९) हल्ले केले होते. त्यानंतर पूर्णदेशभर आंदोलकांवर हे हल्ले सुरू झाले होते. या हल्ल्यांमध्ये शेकडो आंदोलक जखमी झाले होते. या हिसांचारानंतर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि तीनही दलांना पाचारण करून हिंसा करणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते.

सोमवारी (ता. ९) घडलेल्या दुर्दैवी घटनेसंबंधात कोणत्याही चौकशीसाठी मी वैयक्तिक माझे पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मी किंवा माझ्या वडिलांचा श्रीलंका सोडून जण्याचा कोणताही इरादा नाही. आम्ही श्रीलंकेतच राहणार आहोत.
- नमल राजपक्ष, माजी मंत्री, श्रीलंका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com