Soil Health : उत्पादकतेबरोबर जमीन आरोग्यही जपा

राज्यात सर्वच पिकांची उत्पादकता प्रभावित होण्यामागे जमिनीचा खालावलेला पोत हे कारण आहे.
Soil Health
Soil HealthAgrowon

चंद्रपूर ः राज्यात सर्वच पिकांची उत्पादकता (Crop Productivity) प्रभावित होण्यामागे जमिनीचा खालावलेला पोत (Soil Fatality) हे कारण आहे. जमिनीचे आरोग्य, पिकाची फेरपालट अशा उपचारातूनच उत्पादकता राखता येईल.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक उत्पादकतेचा विचार करताना जमिनीच्या आरोग्याकडे (Soil Health) लक्ष्य देण्याची गरज असल्याचे मत राज्याचे जल व मृद्संधारण संचालक रवींद्र भोसले यांनी व्यक्‍त केले.

कृषी विभाग आणि टिएस ऑर्गो ऑर्गेनिक यांच्या संयुक्‍त सहकार्याने मूल येथे आयोजित सेंद्रिय शेती तणावमुक्‍त शेतकरी या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, मुल तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, रूरल चेंबर ऑफ कॉमर्सचे अतुल घुईखेडकर, टीएसऑर्गो ऑर्गेनिकचे कमलेश झोडे, सुरेश ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती.

भरडधान्य वर्षानिमित्त माहिती फलकाचे विमोचन या वेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

Soil Health
Soil Health : ‘मृदा आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक’

भोसले म्हणाले, की पूर्वी शेती आणि दुधासाठी जनावरांचे संगोपन घरोघरी होत होते. हे पशुधन चरण्यासाठी शेतशिवारात गेल्यानंतर शेण व गोमूत्र मातीत मिसळायचे, त्याचा उपयोग शेतीला होत होता.

आता मात्र यांत्रिकीकरण वाढले आणि पशुधनावर आधारित शेती पद्धती संपुष्टात आली. उत्पादकता वाढीच्या स्पर्धेत बेसुमार खत आणि रासायनिक घटकांचा मारा होण्यास सुरुवात झाली. त्यातून सुरुवातीला उत्पादकता मिळाली आता मात्र ती कमी होत असल्याचे निरीक्षण आहे.

Soil Health
Soil Health : मातीच्या आरोग्यावर चर्चासत्रात मार्गदर्शन

भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शेतीक्षेत्रात शेती न करता केवळ शेतकऱ्यांना सला देणाऱ्या सल्लागारांची संख्या वाढल्याने शेतीसमोरील आव्हाने वाढल्याचा मुद्दा मांडला. त्यातूनच जमिनीचे आरोग्य दुर्लक्षित झाले आणि मानवी आरोग्यही यातून प्रभावित झाले आहे.

पारंपरिक पिकांचा ऱ्हास होत गेला. ज्वारीसारखे पीक चारा आणि धान्य या दोन्हींसाठी उपयोगी होते. आंध्र प्रदेशमध्ये भातानंतर ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही त्याला प्रोत्साहन देण्यात आले यातून विदर्भात ज्वारीखालील सर्वाधीक क्षेत्र असलेला जिल्हा अशी ओळख चंद्रपूरला मिळाला आहे. या भागातील एखाद्या तांदूळ वाणाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

अतुल घुईखेडकर यांनी गाव राजकारणमुक्‍त करण्याचा व शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. कमलेश झोडे, सूर्यभान ठाकरे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com