Maize Cultivation : धानपट्ट्यात २५० एकरांवर बहरले मका पीक

Maize Market Update धानपट्ट्यात पीक फेरपालटाला प्रोत्साहन देत मका लागवडीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
Maize Cultivation
Maize CultivationAgrowon

Chandrapur News : धानपट्ट्यात पीक फेरपालटाला प्रोत्साहन देत मका लागवडीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या मक्‍यापासून मुरघास तयार करून त्याच्या विक्रीचे नियोजन असून त्या माध्यमातून उत्पन्नात वाढीचा पर्यायही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात कापूस, सोयाबीन यासारखी पिके घेतली जातात. मुल तालुक्‍यात मात्र धानाखालील सर्वाधीक क्षेत्र आहे. या तालुक्‍यात एकूण वहितीखालील क्षेत्र २८ हजार हेक्‍टर असून त्यापैकी २४ हजार हेक्‍टरवर धानाची लागवड होते. उर्वरित चार एकर क्षेत्रात इतर पिकांचा समावेश आहे.

त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत धानाची उत्पादकता कमी झाली आहे. त्यासोबतच दरही कमी मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत अपेक्षीत सुधारणा झाली नाही, हे वास्तव आहे.

त्याच कारणामुळे या भागात पीक फेरपालटाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मका लागवड आणि त्यापासून मुरघास तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

Maize Cultivation
Maize Growers Loot : बाजार समित्यांत मका उत्पादकांची कटतीतून लूट

मूल तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मूल तालुक्‍यातील चिरोली, चिखली, डोंगरगाव, कुसराळा, माटोड या भागात सद्यःस्थितीत २५० एकरांवर मका लागवड आहे. दहा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मुरघास तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मिल्की स्टेजला मका कापणी होत असल्याने शेतकऱ्यांना मक्‍याचे दुसरे पीक घेणे शक्‍य होते.

Maize Cultivation
Maize Market Rate : बुलढाण्यात रब्बी मक्याचा दर दीड हजारापर्यंत

त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरघास तयार होणार आहे. मुरघास जनावरांसाठी चांगला आहार ठरतो. त्यामुळे याला मागणी देखील अधिक आहे. नुसता मका विक्री केला असता तर उत्पन्न मर्यादित असते.

परंतु मुरघासच्या विक्रीतून अतिरिक्‍त १५ ते १६ हजार रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा देखील याला चांगला प्रतिसाद आहे. परिणामी येत्या काळात मक्‍याखालील क्षेत्र या भागात वाढीस लागेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

मिल्की स्टेजला असताना कापणी केल्यास रानटी डुकरांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यासोबतच एक महिना आधीच कापणी केल्याने दुबार पीक घेणे शक्‍य होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतो. मका लागवडीवरच न थांबता शेतकऱ्यांना त्यापासून मुरघास तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्याला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद आहे.
- भास्कर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, मूल, चंद्रपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com