Maize Research Center : मका, आले संशोधन केंद्राचे प्रस्ताव अधांतरीच?

मराठवाड्यात मका व आले पिकाचे क्षेत्र वाढते आहे. मका पिकाचे हब म्हणून औरंगाबाद व जालना जिल्ह्याकडे पाहिले जाते.
Maize
MaizeAgrowon

Maize Research Center औरंगाबाद : मराठवाड्यात मका (Maize) व आले (Ginger) पिकाचे क्षेत्र वाढते आहे. या पिकांसाठी हवामानाची अनुकूलता व प्रतिकूलता पाहता या भागात प्रस्तावीत करण्यात आलेल्या मका व आले संशोधन केंद्राला (Maize Research) शासनाची मंजुरी मिळणार तरी केव्हा, त्यासाठी आवश्‍यक तरतूदी शासन करणार तरी केव्हा हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Maize
Maize Rate : आज मक्याला सर्वाधिक दर राज्यातील कोणत्या बाजारात मिळाला?

मराठवाड्यात मका व आले पिकाचे क्षेत्र वाढते आहे. मका पिकाचे हब म्हणून औरंगाबाद व जालना जिल्ह्याकडे पाहिले जाते. या दोन्ही पिकांना शेतकऱ्यांची मिळत असलेली पसंती पाहून साधारणतः २०१३ पासून औरंगाबाद जिल्ह्यात गल्लेबोरगाव येथे मका संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी पुढे आली होती. त्यावेळी शासनाने कृषी विद्यापीठाने कृषी विभागाच्या गल्लेबोरगाव येथील प्रक्षेत्रावर संशोधन करावे आदेशित केले होते.

शिवाय अलीकडच्या काही वर्षात आले पिकाचेही संशोधन केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात व्हावे, अशी मागणी सुरू आहे. गल्लेबोरगाव येथे मका संशोधन केंद्र व्हावे अशी मागणी पुढे आल्यानंतर झालेल्या हालचालीनंतर ते केंद्र होईल असे वाटत होते.

परंतु माशी कुठे शिंकली कोण जाणे. आता पुन्हा एकदा मका व आले संशोधन केंद्राच्या मागणीने जोर धरला आहे.

त्याला अनुसरून काही महिन्यांपूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून दोन्ही केंद्राविषयीचे प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे व परिषदेकडून नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

Maize
Maize Export : देशातून मका निर्यात वाढली

या प्रस्तावात सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र तर गल्लेबोरगाव येथे आले संशोधन केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. आता हे प्रस्ताव संशोधन केंद्राचे असल्याने त्यासाठी मनुष्यबळासह, इमारत, संशोधनासाठीचे क्षेत्र आदींसह निधीची तरतूद शासनाने तत्काळ प्रभावाने करणे अपेक्षीत असणार आहे.

याविषयी बैठकांचे सत्र सुरू असले तरी त्या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी केव्हा मिळणार त्यासाठीची आवश्‍यक तरतूद शासन केव्हा करणार हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे.

पीक संशोधन केंद्रासाठी निधीची तरतूद कधी ?

फळसंशोधन, मोसंबी, तेलबिया, कडधान्य, कपाशी, ज्वारी, बाजरी आदी संशोधन केंद्र मराठवाड्यात आहेत. मका व आले पिकाचे वाढते क्षेत्र व त्यावर प्रक्रियेसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या पाहता दोन्ही संशोधन केंद्राचे महत्त्व अनन्य साधारण असणार आहे.

विभागनिहाय जमीन, हवामान, पाऊसकाळ वेगळे असल्याने त्या भागातील त्या पिकावर होणारे प्रतिकूल व अनुकूल परिणाम लक्षात घेऊन त्यानुसार संशोधनातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण व व्यवस्थापनात्मक शिफारशी तत्काळ प्रभावाने होणे अपेक्षीत असते.

त्यामुळे प्रस्तावीत मका व आले पिकाचे संशोधन केंद्राची अत्यंत गरज आहे. फक्‍त प्रस्तावापुरते मर्यादित न राहता राज्याच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी शासनस्तरावरून मराठवाड्यासाठी अत्यावश्‍यक अशा मका व आले पीक संशोधन केंद्रासाठी निधीची, मनुष्यबळाची तरतूद केली जाणार का हा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com