Maratha Seva Sangh : महामानवांची बदनामी करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद करा

मराठा -कुणबी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी मतभेद विसरुन एकत्र यावे लागेल. धर्मसत्ता, शिक्षणसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, माध्यम सत्ता काबीज करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
Purushottam Khedekar
Purushottam KhedekarAgrowon

परभणी ः मराठा -कुणबी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी मतभेद विसरुन एकत्र यावे लागेल. धर्मसत्ता, शिक्षणसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, माध्यम सत्ता काबीज करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी केले.

मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा समारोप रविवारी (ता. २५) खेडेकर यांच्या अध्यक्षेखाली झाला. या वेळी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष नेताजी गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मधुकर मेहकरे, अर्जुन तनपुरे, स्वागताध्यक्ष कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, विठ्ठल भुसारे, गजानन काकडे उपस्थित होते.

Purushottam Khedekar
Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

खेडेकर म्हणाले, की मनुस्मृती जाळली आहे, तिचा परत उल्लेख करू नये. नवीन शिक्षण पद्धती स्वीकारावी. गावागावात पतसंस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. विदेशातील समाज बांधवांनी समाज कार्यासाठी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे. नवीन समाज बांधव जोडले गेले पाहिजेत. या वेळी भुसारे यांनी ठरावांचे वाचन केले.

Purushottam Khedekar
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीस मान्यता

महाअधिवेशनात मांडलेले ठराव...

महामानवांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद असणारा कायदा करावा.

छत्रपती शिवाजी महाराज चरित्रे साधन समिती स्थापन करावी. त्यासाठी किमान ५०० कोटी रुपये तरतूद करून शिवचरित्राचे जगभरातील साहित्य जमा करून प्रकाशित करावे.

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ महिला विद्यापीठ स्थापन करावे.

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाला महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव द्यावे.

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा.

जातनिहाय जनगणना करावी.

सारथी संस्था सक्षम करावी. दरवर्षी एक हजार कोटी रुपये निधी द्यावा.

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत वसतिगृह व शिक्षणाची सोय करावी. उद्योग व्यवसायाची संधी निर्माण करावी.

मराठा इतिहासाचे सत्य लेखन करून शालेय ते विद्यापीठ शिक्षणात समावेश करावा.

चित्रपट, मालिका, ललित साहित्य व इतर माध्यमातून होणारी मराठा समाजाची बदनामी थांबवावी. दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com