
नांदेड : अंगावर चाबकाचे फटके ओढणारे वारू.... संबळाच्या तालावर नाचणारे... गोंधळी... मुरळी... भंडारा खोबऱ्याची उधळण आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत... लाखोंच्या संख्येने उपस्थित झालेले भाविक... अशा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने उसळलेल्या जनसागराच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पालखीच्या पूजनाने श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेचा (Malegaon Yatra ) प्रारंभ झाला.
या वेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अनुराधा राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. धरणे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, प्रकल्प संचालक श्री. तुबाकले, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, गटविकास अधिकारी श्री. वाव्हळे, माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, विजय धोंडगे, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, उपजिल्हाधिकारी श्री. रंगदळ, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, कॉँग्रेसचे शरद पवार, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अमोल पाटील, यात्रा सचिव श्रीमती कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, उपशिक्षणाधिकारी बंड आमदुरकर भाविक व यात्रेकरू उपस्थित होते.
मागील तीन वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरवण्यात आली नव्हती. तीन वर्षांच्या खंडानंतर भरणाऱ्या यात्रेत मोठ्या प्रमाणात व्यापारी, भाविक व यात्रेकरू दाखल झाले आहेत, यात्रेचे आकर्षण असलेले अश्व, गाढव, उंट यात्रेत दाखल झाले आहेत. मात्र ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या पार्श्वभूमीवर गोवंश यात्रेत प्रतिबंध आहे,
मानकऱ्यांचा गौरव
पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा, पांडुरंग नारायण पाटील, माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.