Congress President: मल्लिकार्जुन खरगे कॉँग्रेसचे नवे अध्यक्ष

राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाच्या (Indian National Congress) अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे (Mallikaarjun Kharge) यांनी बाजी मारली आहे. कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये शशी थरूर (Shahi Tharur) आणि मल्लिकार्जुन खरगे यांची लढत रंगली होती.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeAgrowon

राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाच्या (Indian National Congress) अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे (Mallikaarjun Kharge) यांनी बाजी मारली आहे. कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये शशी थरूर (Shahi Tharur) आणि मल्लिकार्जुन खरगे यांची लढत रंगली होती.

या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरुर यांचा पराभव केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना 90 टक्के मतं मिळाली. त्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे.

एकूण 9385 मतांपैकी खरगे यांना 7897 मतं मिळाली तर थरूर यांना 1072 मतं मिळाली. तर 416 मतं अमान्य करण्यात आली. खरगे यांची अध्यक्षपद निवड झाल्यामुळे कॉँग्रेसमधील अंतर्गत रचनेत बदल करण्यात येतील अशी चर्चाही सुरू आहे.

2000 साली सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यामध्ये सोनिया गांधी यांनी बाजी मारली होती.

मल्लिकार्जुन खरगे यांची ओळख शांत, संयमी व्यक्तिमत्त्व अशी ओळख आहे. गांधी परिवाराशी जवळीक आणि वरिष्ठाचं समर्थन यामुळे खरगे यांचा विजय निश्चित मानला जात होता. खरगे यांचा जन्म 12 जुलै 1942 साली झाला.

कॉँग्रेस पक्षातील महत्त्वाचा नेता अशी त्यांची ओळख आहे. सुरुवातीच्या काळात कर्नाटकमध्ये अनेक आंदोलन करत त्यांनी कॉँग्रेसमध्ये स्थान मिळवलं.

त्यानंतर ते 1972 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2008 पर्यंत 9 वेळा आमदार म्हणून काम् केलं. 2009 आणि 2014 मध्ये कर्नाटक येथील गुलबर्गा लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकलीसुद्धा. मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांचेकडे कामगार मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com