Jal jeevan Mission : कोळींना मुदतवाढ, कमळेंना सक्तीची रजा

जलजीवन मिशनमध्ये झालेल्या गैरव्यवहारावर बोट ठेवून सीईओ दिलीप स्वामी यांनी संबधितांवर कारवाईला सुरवात केली आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionAgrowon

Solapur News जलजीवन मिशनमध्ये (Jal Jeevan) झालेल्या गैरव्यवहारावर बोट ठेवून सीईओ दिलीप स्वामी यांनी संबधितांवर कारवाईला सुरवात केली आहे.

तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार आहे.

सांगोल्याचे उपअभियंता यांना निलंबनाची नोटीस बजावली असून त्यांनी अदा केलेल्या बिलांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाणार आहे. सांगोल्यातील कंत्राटी अभियंता अमर कांबळे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. (Latest Agriculture News)

जलजीवन मिशनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या संजय माळी व संतोष कुलकर्णी समितीने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई झाली आहे.

जलजीवन मिशनमधील कामांच्या फाईल्स पाहण्यासाठी मला किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्या अशी मागणी तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्याकडे केली होती. कोळी यांची मागणी स्वामी यांनी फेटाळून लावली आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनची कामे गुणवत्तापूर्ण करा ः खांडेकर

कोळी यांना तीन महिन्यांची नाही परंतु आठ ते दहा दिवसांची मुदतवाढ दिली जाईल अशी माहिती सीईओ स्वामी यांनी गुरुवारी (ता. ५) दिली आहे. शेकापचे नेते बाबासाहेब करांडे व बाळासाहेब काटकर यांच्या उपस्थितीत सीईओ स्वामी यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनसाठी जिल्ह्याला साडेसातशे कोटी रुपये

सांगोला तालुक्यातील आठ गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रके तयार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आठ गावांमध्ये नव्याने अंदाजपत्रके तयार केली जाणार आहेत. ही अंदाजपत्रके ग्रामस्थांच्या समोर तयार करून गावातील वंचित वाड्या-वस्त्यांचा त्यामध्ये समावेश करण्याची सूचना सीईओ स्वामी यांनी केली आहे.

शेकापचे नेते म्हणाले, आंदोलनाचे यश

जलजीवन मिशनमधील कारभारा संदर्भात आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई केली आहे.

काही मुद्यांवर कारवाई सुरू आहे. कार्यकारी अभियंता कोळी व उपअभियंता कमळे यांच्या बद्दलचा अहवाल जिल्हा परिषदेच्यावतीने राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामाची पूर्तता करणारे गाव हरघर जल घोषित

हा अहवाल मी बघितला असून या अहवालावरून ते दोघेही निलंबित होतील असा माझा अंदाज असल्याचे शेकाप नेते बाबासाहेब करांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शेकापच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे हे यश आहे. आजच्या बैठकीत जे ठरले त्यानूसार घडले नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कांबळेंची कामे रद्द; नव्याने निविदा

अमर कांबळे हे शहा टेक्निकल कन्सलटन्सी प्रा. लि. च्या माध्यमातून जिल्हा परिषदेत जलजीवनच्या कामात कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत होते.

या ठिकाणी कार्यरत असतानाही त्यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून शिवणगी (ता. मंगळवेढा) येथील ६३ लाख २८ हजार, आढीव (ता. पंढरपूर) येथील १ कोटी १० लाख व सरकोली (ता.पंढरपूर) येथील १ कोटी ३७ लाख रुपयांचे जलजीवनचे काम त्यांनी घेतले होते. या कामाचा कार्यारंभ आदेशही झाला होता.

हा आदेश रद्द करून या कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. २५ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या तीन कामांच्या निविदा भरण्यासाठी १ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही कामे कोणाला मिळतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जलजीवन मिशनमध्ये ज्या कोणी चुकीची कामे केली आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई करताना सर्व नियमांचे पालन केले जाईल. संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाईल. उपअभियंता कमळे यांच्या माध्यमातून अदा झालेल्या देयकांची तपासणी करण्याची सूचना दोन अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर कमळे यांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com