Harshawardhan Patil : आता सरकारही गेले आणि मामाही : पाटील

आता सरकारही गेले आणि मामाही गेल्याने आता काय सांगावे,’’ असा उपरोधिक टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपले राजकीय विरोधक दत्तात्रेय भरणे यांना लगावला.
Harshawardhan Patil
Harshawardhan PatilAgrowon

सोलापूर : ‘‘जुनं सरकार गेलंय, आता नवीन सरकार आलंय. नवीन सरकारचं काय ते बोला आता. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना (Irrigation Scheme) ही मुळात २०१२ मध्येच मंजूर झालेली आहे. ते पालकमंत्री आता दोन वर्षांपूर्वी झाले होते. ते इथे काय बोलतात आणि तिथे काय बोलतात, हे तुम्ही त्यांनाच विचारले तर अधिक चांगले होईल. आता सरकारही गेले आणि मामाही गेल्याने आता काय सांगावे,’’ असा उपरोधिक टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) आपले राजकीय विरोधक दत्तात्रेय भरणे (Dattatrya Bharne) यांना लगावला.

Harshawardhan Patil
Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

मनोरमा सहकारी बॅंकेच्या सभासद प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हर्षवर्धन पाटील हे रविवारी (ता. १८) सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मध्यंतरी उठलेल्या उजनीच्या पाण्यावर आपले मत व्यक्त केले.

Harshawardhan Patil
Devendra Fadanvis : मंत्र्यांना माध्यमांसमोर बोलण्यास मनाई करण्यामागे फडणवीसांचा उद्देश काय?|ॲग्रोवन

पाटील म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी २०१२ मध्येच एक टीएमसी पाणी मिळाले होते. त्यामुळे लाकडी-निंबोडी योजनेच्या पाण्याचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाण्याचा तसा कुठेही संबंध नाही.’’

Harshawardhan Patil
Heavy Rainfall : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

दरम्यान, याच पाण्याच्या प्रश्नावरून इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री भरणे यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून घ्यावे, अशीही मागणी झाली होती.

तसेच इंदापूरमध्ये पाटील आणि भरणे यांच्यात वाद रंगला हेाता. उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्हा आणि इंदापूरचे संबंध बिघडले होते. त्यावरच पाटील यांनी रविवारी (ता.१८) सोलापुरात येऊन भाष्य केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com