ममता बॅनर्जी बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे धोरण ठरविण्यासाठी ममता बॅनर्जी यांनीच दिल्लीत १५ तारखेला पहिल्यांदा बैठक आयोजित केली होती.
ममता बॅनर्जी बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता
Mamata BanerjeeAgrowon

कोलकता (वृत्तसंस्था): आगामी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी (ता. २१) बोलाविलेल्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी तृणमूल काँग्रेसचा ज्येष्ठ नेता या बैठकीला उपस्थित राहील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

ममता बॅनर्जी काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. याबद्दल त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनाही कल्पना दिली होती. मात्र, बैठकीला आमच्या पक्षातील नेता हजर राहील, असे तृणमूलच्या सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे धोरण ठरविण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीच दिल्लीत १५ तारखेला पहिल्यांदा बैठक आयोजित केली होती. देशाची लोकशाही मूल्ये टिकवून ठेवणारा उमेदवार विरोधकांच्या वतीने निवडण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले होते.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ‘राजद’सह विविध १७ पक्षांचे उमेदवार हजर होते. शरद पवार यांनी आपण राष्ट्रपती निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्याने नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचे नाव पुढे आले होते. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीच अब्दुल्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सक्रिय राजकारणात कायम राहण्याचा निर्धार करत अब्दुल्ला यांनीही या निवडणुकीतून माघार घेतली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com