Rain Update : मंचरमध्ये ५४ मिलिमीटर पावसाची नोंद

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर (Rain Intensity) वाढला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला असून अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. मंगळवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जुन्नरमधील मंचर येथे ५४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Rain Update
Rain : पावसाचा बसतोय भाजीपाला पिकाला फटका

परतीचा पाऊस दाखल होण्यासाठी काही दिवसाचा कालावधी बाकी आहे. त्यातच पावसाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अचानक होत असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. नद्या, ओढे-नाल्याचे पाणी जवळच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे चांगलेच नुकसान होत आहे.

Rain Update
Rain Update : विदर्भाला मुसळधारेने झोडपले

हवेलीतील भोसरी येथे १८ मिलिमीटर पाऊस पडला. तर, चिंचवड, कळस, पुणे वेधशाळा, खडकवासला या भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. केशवनगर, कोथरूड, थेऊर, उरुळीकांचन, खेड, हडपसर, वाघोली भागांत ढगाळ वातावरण होते.

मुळशीतील मुठे येथे ४० मिलिमीटर, तर पौड १३, माले १४, तर पिरंगुट, थेरगाव पावसाचा शिडकावा झाला. भोरमधील नसरापूर १२, आंबवडे ११, निगुडघर १० मिलिमीटर, तर किकवी, वेळू, भोर, भोलावडे, संगमनेर हलका पाऊस पडला. मावळमधील काले ११, कार्ला १२, खडकाळा २१, लोणावळा २१ मिलिमीटर, वेल्ह्यातील पानशेत १८, वेल्हा १२, विंझर १३, आंबवणे १२, जुन्नरमधील नारायणगाव २४, निमगाव सावा १०, बेल्हा २४, राजूर ३४, डिंगोरे २०, आपटाळे १६, खेडमधील वाडा २९, पाईट १२, कन्हेरसर १४, आंबेगावमधील घोडेगाव १०, कळंब २३, बारामतीतील वडगाव २५, उंडवडी १२ दौंडमधील देऊळगाव ३८, पाटस ३५, वरवंड १५, रावणगाव २२, दौंड २७ मिलिमीटर पाऊस पडला. तर जुन्नर, वडगाव आनंद, राजगुरुनगर, कुडे, चाकण, कडूस, आळंदी, पिंपळगाव, शिवणे, वडगाव मावळ, तळेगाव, आंबेगाव, पारगाव, लोणी, सुपा, मोरगाव, कडेगाव, राहू, टाकळी, वडगाव, न्हावरा, तळेगाव, रांजणगाव, पाबळ, शिरूर, बारामती, माळेगाव, पणदरे, भिगवण, इंदापूर, लोणी, सणसर, सासवड, भिवंडी, जेजूरी, परिंचे, वाल्हा भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ओतूर, मलठण, कोरेगाव, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, यवत, कुंभारवळण, राजेवाडी भागांत अधूनमधून उन्हासह ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com