Dharur APMC : धारूर बाजार समितीच्या सभापतिपदी मंगेश तोंडे

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे नेते महादेव तोंडे यांचे चिरंजीव मंगेश महादेव तोंडे यांची तर उपसभापतिपदी सुनील शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे.
Dharur APMC
Dharur APMCAgrowon

किल्लेधारूर जि. बीड : धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharur APMC) सभापतिपदी भाजपचे नेते महादेव तोंडे (Mahadev Tonde) यांचे चिरंजीव मंगेश महादेव तोंडे यांची तर उपसभापतिपदी सुनील शिनगारे (Sunil Shingare) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Dharur APMC
APMC : बाजार समित्यांना मालमत्ता करातून सूट द्या ः सोमवंशी

धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती १८ पैकी १७ संचालक भाजपचे निवडून आल्यावर भाजपच्या ताब्यात एकतर्फी आली. या निवडणुकीमध्ये भाजप नेते रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे व डाॕ. स्वरूपसिंह हजारी यांनी ही बाजार समिती ताब्यात ठेवण्यात पुन्हा यश मिळवले होते.

Dharur APMC
Vasmat APMC : वसमत बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व

निवडणुकीमध्ये १८ पैकी १७ संचालक भाजपचे निवडून आले होते. सभापती उपसभापतिपदाच्या निवडीसाठी सोमवारी (ता. २) झालेल्या बैठकीत सभापतिपदी मंगेश महादेव तोंडे यांची तर उपसभापतिपदी सुनील भैरवनाथ शिनगारे यांची निवड एकमताने बिनविरोध करण्यात आली.

मंगेश तोंडे यांच्या रूपाने सर्वात तरुण केवळ २४ वर्ष वयाच्या युवकाला सभापतीपदाची संधी मिळाली आहे. तालुक्यात तरुणाला संधी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यात आनंद व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com