Hunger Strike : आंबा, काजू बागायतदारांचा कर्जमाफीसाठी उपोषणाचा इशारा

शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबविली. या योजनेचा दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळालेला नाही.
Hunger Strike
Hunger StrikeAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः दोन लाखांवरील कर्जदार आणि खावटी कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी जिल्ह्यात आंबा, काजू (Mango, Cashew) बागायतदार येत्या २७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) उपोषण करणार आहेत. त्यासंदर्भात बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती दिली.

शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबविली. या योजनेचा दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळालेला नाही. हा त्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील खावटी कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, अल्पभूधारक आणि मध्यम मुदतीची कर्जे कोव्हीड कालखंडात शेतकऱ्यांना भरता आलेली नाहीत. ती माफ करावीत, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांनी शासनाकडे केली.

यापूर्वी अनेकदा निवेदने, आंदोलने करूनही शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे २७ सप्टेंबरला जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतील. या संदर्भात बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करून या उपोषणासंदर्भात माहिती दिली. या वेळी बागायतदार शंकर घारे, गंगाराम राऊळ, अशोक सावंत, वैभव तांडेल, यशवंत सावंत, गुंडू परब, सुनील घोगळे, भाई धर्ने, विजय भगत, नारायण गावडे, रमाकांत पेडणेकर, सुधीर परब आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com