Mango Festival : आंबा महोत्सवाला सुरुवात

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत ‘आंबा महोत्सव २०२३’ ला शनिवारपासून (ता.१) प्रारंभ झाला.
Mango Festival
Mango FestivalAgrowon

Pune News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत ‘आंबा महोत्सव २०२३’ (Mango Festival 2023) ला शनिवारपासून (ता.१) प्रारंभ झाला. गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Mango Festival
Hapus Mango Market : हापूस आंब्याची आवक वाढली; दरही उतरले

कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’अंतर्गत गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येत आहे.

विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले.

Mango Festival
Mango Production And Management : आंबा उत्पादनाला फटका बसणार? वेळीचं घ्या बागांची काळजी

या वर्षी महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील, तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश आला आहे. आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे करण्यात आल्यानंतर त्यांना स्टॉलवाटप करण्यात आले आहे.

या वर्षी सुमारे १०५ उत्पादकांनी विभागीय कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतीचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

हा महोत्सव ग्राहकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात येत असून, सुमारे ७० स्टॉल उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यामुळे ग्राहकांना हापूस, केशर, पायरी आंबा तसेच बचत गटांची विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांच्‍या खरेदीची संधी ग्राहकांना मिळणार असल्याचे शिंदे म्हटले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com