Mango Season : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा उत्पादक संकटात

Unseasonal Rain : वातावरणातील बदलांचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा आंबा पिकावर मोठा परिणाम होत आहे.
Mango Season
Mango SeasonAgrowon

Mango Cultivation : वातावरणातील बदलांचा (Climate Change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा (Hailstorm) आंबा पिकावर मोठा परिणाम होत आहे.

हवामान बदलांमुळे राज्यातील आंब्यावर बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव (Pest Disease Outbreak On Mango Crop) झाल्याचे दिसत आहे.

तसेच अनेक भागात फळगळ झाली आहे. परिणामी ऐन हंगामात आंबा उत्पादनात (Mango Production) घट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस तर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये थंडीचा कालावधी कमी राहिल्याचे पाहायला मिळाले. मोहर लागण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहर काही प्रमाणात गळाला.

सध्या देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी कडक उन तर कधी ढगाळ हवामान आणि अवकाळीच्या सरी कोसळत आहेत.

त्यामुळे बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. आंबा पिकाचेही अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे.

देशातील ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आंबा पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Mango Season
Mango Production : आंबा हेक्टरी ६०० ते ७०० किलोच

राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा फळबागांसह रब्बीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे.

गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळीमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आंबा पिकाची मोठी नासाडी झाली आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Mango Season
Mango Season : आंबा हंगामावर हवामान बदलाचे सावट

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात लहरी हवामानामुळे आंब्याला मोहोर येत नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वातवरणातील बदलांमुळे आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. तसेच अवकाळीमुळे निर्माण झालेला ओलाव्यामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहे. ओडिशामध्येही अवकाळीचा आंबा बागांवर परिणाम होताना दिसत आहे.

ओडिशामध्ये अवकाळी पाऊस आणि आता तापमानात अचानक वाढ झाल्यामुळं आंब्याच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.

राज्यातील कोरापूट जिल्ह्यात ७० टक्के आंब्याचे नुकसाना झाले आहे. त्यामुळे येथील व्यापारी परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आयात करत आहेत.

कुंद्रा, दशमंतपूर, जेपोर, बोरीगाम्मा, सेमिलीगुडा आणि लक्ष्मीपूर भागातही आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.

यंदा राज्यात कमी खप अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळं पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातील व्यापारीही आंबा खरेदी करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com