आंब्याचे दर घटले, कैरी किंचित वधारली

आंब्याची आवक सर्वाधिक १५५६ क्विंटल झाली.१२४ ते ७०० दोन क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या आंब्याला सरासरी ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.
आंब्याचे दर घटले, कैरी किंचित वधारली
MangoAgrowon

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ ते १० जून दरम्यान ढोबळी मिरची, गवार, ढेमसे, हिरवी मिरची, आंबा व कैरीची कमी अधिक प्रमाणात आवक झाली. आंब्याचे दर किंचित घटले तर कैरीचे दर किंचित वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ५ ते १० जून दरम्यान ढोबळ्या मिरचीची चार वेळा मिळून ७८ क्विंटल आवक झाली. १२ ते ३० क्विंटल दरम्यान कमी-अधिक प्रमाणात वक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी २२५० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला.

गवारची आवक ४ वेळा मिळून ७३ क्विंटल झाली. १२ ते २५ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गवारचे सरासरी दर २००० ते ३ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहीले. ढेमसाची पाच दिवसात केवळ दोन वेळा अनुक्रमे ९ व १२ क्विंटल आवक झाली. या ढेमसाला सरासरी २६०० ते २७५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.

हिरव्या मिरचीची २४५ क्विंटल आवक झाली. ३४ ते ११४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ३२५० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.

आंब्याची आवक सर्वाधिक १५५६ क्विंटल झाली.१२४ ते ७०० दोन क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या आंब्याला सरासरी ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. दुसरीकडे कैरीची एकूण आवक ७०८ क्विंटल झाली. ८१ ते २२३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या कैरीला सरासरी १५०० ते २२५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com