BRS Kisan Cell : बीआरएस किसान सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम

माणिक कदम हे गेल्या २५ वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या समवेत त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला.
BRS Kisan Cell
BRS Kisan CellAgrowon

परभणी ः भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtr Samiti) (बीआरएस) किसान सेलच्या (Kisan Cell) महाराष्ट्र अध्यक्षपदी परभणी जिल्ह्यातील आर्वी (ता. परभणी) येथील शेतकरी नेते माणिक कदम (Manik Kadam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीआरएसचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chndrashekhar Rao) यांनी रविवारी (ता. २६) कदम यांना नियुक्तीपत्र दिले.

माणिक कदम हे गेल्या २५ वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या समवेत त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला.

BRS Kisan Cell
K. Chandrshekhar Rao : ‘बीआरएस’ महाराष्ट्रात करणार पक्ष विस्तार

ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर मराठवाडा विभाग अध्यक्ष होते. कदम यांनी २०१४ पासून मी शेतकरी आत्महत्या करणार नाही हा उपक्रम राबविला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या.

शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जागृतीचे कार्य केले आहे. त्यांच्या शेतकरीविषयक कार्याची दखल घेत. बी.आर.एस. पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माणिक कदम यांची भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com