Rain : पावसाने पुन्हा मराठवाड्याला झोडपले !

कोकणात काही भागांत मध्यम सरी पडल्या. तर ठिकठिकाणी हलका पाऊस झाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्याच्या बहुतेक भागांत पावसाने हजेरी (rainfall In Maharashtra) लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागांत जोरदार पाऊस (Heavy Rain In Marathawada) झाला. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय.

कोकणात काही भागांत मध्यम सरी पडल्या. तर ठिकठिकाणी हलका पाऊस झाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही बहुतांश भागांत पाऊस झाला. धरणक्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने झोडपले. फलटण, कऱ्हाड, वाई सातारा या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. नगर जिल्ह्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार सावेडी, भांबोरा, वांबोरी, पेंडगाव या चार मंडलांत अतिवृष्टी झाली.तर अन्य तीस मंडलांत जोरदार पाऊस झाला.

Rain Update
Cotton Sowing: देशात यंदा विक्रमी कापूस लागवडीची शक्यता | Cotton Market|ॲग्रोवन |

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत पावलाच्या सरी झाल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील ५० मंडलांत पाऊस झाला. तर ७ मंडलांत अतिवृष्टी झाली. हरसूल, पिंपळवाडी, बिडकीन, लासूरगाव, महालगाव, लाडगाव या मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ३७ मंडलांत पावसाने हजेरी लावली. बदनापूर मंडलात १०३.५ मिलिमीटर तर रांजणी मंडलात १३७.३ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील २८ मंडलांत हलक्या सरी झाल्या. लातूर जिल्ह्यातील ५७ मंडलांत पाऊस झाला.

Rain Update
Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पहाटे चार मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. उमरी, लोहा, अर्धापूर, मुदखेड, कंधारमध्ये जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. वसरणी, वाजेगाव, विष्णुपुरीआणि तुप्पा मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ४१ मंडलांत तर हिंगोली जिल्ह्यातील २० मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात बऱ्याच भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. तर इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस पडेल. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com