Weather Update : मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

राज्यात दिवसभर उन्हाचा चटका, उकाड्या पाठोपाठ सायंकाळनंतर ढगांची दाटी होत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : राज्यात दिवसभर उन्हाचा चटका (Temperature), उकाड्या (Heat) पाठोपाठ सायंकाळनंतर ढगांची दाटी (Cloudy Weather) होत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस हजेरी (Rainfall) लावत आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Heavy Rain
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणकडे आला असून, अमृतसरपासून बरेली, वाराणसी, पाटना ते आसामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण श्रीलंकेपासून, तमिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा ते मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे.

Heavy Rain
Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा !

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असून, अनेक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दणका दिला आहे. आज (ता. २) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता. २) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग) :

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com