Farmer March : मुक्ताईनगरात शेतकरीप्रश्‍नी उद्या मोर्चा

केंद्र सरकार व राज्यात आलेले शिवसेना शिंदे गट, भाजप सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Agriculture News मुक्ताईनगर, जि. जळगाव : शेतकऱ्यांसह (Farmers Issue) सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) ३ मार्चला सकाळी दहाला मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा (Farmers March) काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Indian Agriculture
Indian Agricultural : वाढत्या उत्पादन खर्चाचे काय?

केंद्र सरकार व राज्यात आलेले शिवसेना शिंदे गट, भाजप सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेले पांढरे सोने कापूस योग्य भाव मिळत नसल्याने घरात पडून आहे.

Indian Agriculture
Indian Agriculture : रोगांच्या प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी नवे मूलद्रव्यीय यंत्र

केळी उत्पादक शेतकरी बांधवांचे ‘सीएमव्ही’ रोगाने मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. महावितरण शेतकऱ्यांनी वीज कापत आहे.

राज्य व केंद्र सरकार शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातर्फे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com