Farmers March : सिंधुदुर्गात कर्जमाफीसाठी नांगर घेऊन मोर्चा

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. खांद्यावर घोंगडी, घोंगडीवर नांगर आणि डोक्यावर टोपी आणि पारंपरिक पेहरावात शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
Crop Loan
Crop LoanAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः खांद्यावर घोंगडी, घोंगडीवर नांगर, डोक्यावर टोपी (Crop Loan)आणि सात-बारा कोरा करण्याची घोषणा देत (Crop Insurance) जिल्ह्यांतील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय (Sindhudurgh Administrative Office) परिसर सोमवारी (ता. १७) दणाणून सोडला.

Crop Loan
ZP School: खेड्यांतल्या पोरांच्या शिक्षणाचं काय होणार?

दोन लाखांवरील शेतकरी कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, खावटी, अल्प, मध्यम मुदत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सात-बारा कोरा करावा, आंबा, काजू बागायतदारांना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

खांद्यावर घोंगडी, घोंगडीवर नांगर आणि डोक्यावर टोपी आणि पारंपरिक पेहरावात शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे, आंबा, काजू बागायतदारांना अनुदान मिळाले पाहिजे, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर शेतकऱ्यांनी दणाणून सोडला.

शासनाने केलेल्या कर्जमाफीचा दोन लाखांवरील कर्जदार आणि खावटी कर्जधारकांना लाभ मिळालेला नाही. तो मिळावा यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असून, सतत पाठपुरावा केल्यानंतरदेखील शासन आमच्या मागण्यांची दखल घेत नाही.

शासनाला जाग आणण्यासाठी सुरुवातीला आम्ही शेतकऱ्यांनी निवेदन दिले, त्यानंतर उपोषण केले, परंतु तरीही शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता आम्ही मोर्चा काढला आहे.

याची देखील दखल घेतली नाही तर आम्ही यापेक्षा अधिक ताकदीने आंदोलन करू, असा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी महादेव परब, श्यामसुंदर राय, सुरेश गावकर, अर्जुन नाईक, प्रभाकर सावंत, नारायण गावडे, यशवंत तेली, प्रमोद सावंत, अजित माळकर आदी सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com