APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुका तीन जानेवारीपर्यंत स्थगित

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असतानाच अशा समित्यांचा निवडणूक कार्यक्रम ३ जानेवारी २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon

जळगाव/नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMC Election) अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असतानाच अशा समित्यांचा निवडणूक कार्यक्रम ३ जानेवारी २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. सहकार प्राधिकरणाने (Cooperative Authority) राज्यातील सर्व बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याबाबत प्राधिकरणाचे आयुक्त (पुणे) यांच्या मान्यतेने, सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यासंदर्भात गुरुवारी (ता.२२) हे आदेश काढले आहेत.

APMC Election
APMC Election : शेतकऱ्यांना उमेदवारी देणारे विधेयक मंजूर

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडील आदेश ६ सप्टेंबर २०२२ नुसार ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत व प्रसिद्ध होणार आहेत, अशा बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम ३ जानेवारी २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १४ अ (१) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम ३ (चार) मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून प्राधिकरण नमूद कारणास्तव बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यासंदर्भात आदेश पारित करण्यात आले आहेत.

राज्यातील कर्जत व खालापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया ६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच उच्च न्यायालयाकडील पुढील आदेशास अधीन राहून, प्राधिकरण कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश पारीत करणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

APMC Election
APMC Election : निवडणूक सुधारणा नक्की कशासाठी?

३ जानेवारीला होणार सुनावणी

नाशिक बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका तालुक्यातील सदानंद नवले यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यावरील सुनावणीत नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले. राज्यभरातून विविध बाजार समित्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. राज्य शासनाने देखील नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावर ३ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील १३ बाजार समित्या अशा...

नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित आहे. याशिवाय लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड, कळवण, मनमाड, नांदगाव, सिन्नर, घोटी, देवळा, सुरगाणा, दिंडोरी, मालेगाव या बाजार समित्यांच्या निवडणुका आता स्थगित झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com