उन्हाच्या तडाख्यात वाजणार बँड बाजा

आठ महिन्यांत ५८ विवाह मुहूर्त, मेमध्ये सर्वाधिक १४ मुहूर्त
Marriage
MarriageAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : दिवाळीचा उत्सव आणि तुळशीविवाह संपताच लग्नसराईची धामधूम सुरू होते. पंचांगशास्त्राप्रमाणे यंदा २५ नोव्हेंबर ते पुढील वर्षी २८ जूनपर्यंत एकूण ५८ विवाह मुहूर्त राहणार आहेत. सर्वाधिक १४ मुहूर्त मे महिन्यात असून, गुरूच्या अस्तामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच मुहूर्त राहणार आहे. त्यामुळे यंदा कडाक्याच्या उन्हातच सनई चौघडे वाजणार आहेत.
आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य व वास्तुशास्त्र विशारद डॉ. अनिल वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी व संपन्नतेचा उत्सव असलेल्या दिवाळीचा समारोप कार्तिक पौर्णिमेला होत आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शनिवार (५ नोव्हेंबर) या वर्षी तुळशी विवाहाचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. ५ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्ती, शनिप्रदोष व शाकव्रत समाप्ती आहे. त्यानंतर लगेच १५ दिवसांनी लग्नसराई व विवाह सोहळे सुरू होणार आहेत.


Marriage
Fertilizer Subsidy : संयुक्त खतांच्या अनुदानात कपात

पंचांगाप्रमाणे यंदा २५ नोव्हेंबर ते २८ जून २०२३ पर्यंत एकूण ५८ विवाह मुहूर्त राहणार आहेत. यात सर्वाधिक १४ मुहूर्त मे महिन्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मे महिन्यात विदर्भातील तापमान ४५ ते ४७ अंशांपर्यंत जात असल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यातच सनई-चौघडे वाजणार आहेत. साधारणपणे मेनंतर सर्वाधिक विवाह एप्रिलमध्ये होत असतात. मात्र या वेळी गुरूचा अस्त असल्यामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच दिवस (३० एप्रिल) मुहूर्त आहे. तर जूनमध्ये १२ आणि फेब्रुवारी महिन्यात १० मुहूर्त राहणार आहेत. २०२३ मध्ये २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे. शास्त्रानुसार या सुमारास विवाह आणि मौंजीचे मुहूर्त नसतात. त्यामुळे चातुर्मास्य समाप्तीनंतर (२४ नोव्हेंबर २०२३ नंतर) विवाह मुहूर्त राहणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

Marriage
Fertilizer Subsidy : खतांच्या पोषणमुल्य आधारित अनुदानात कपात | Agrowon | ॲग्रोवन

पुढील वर्षी २२ एप्रिलपर्यंत गुरू मीन राशीत, अर्थात स्वराशीत असल्यामुळे या काळात सर्वच राशींना गुरू शुभ फलदायक आहे. २३ एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत गुरू मेष राशीत राहणार आहे. त्यामुळे या काळात मिथुन, सिंह, तूळ, धनू व मीन या राशीच्या बटूंना आणि वधूवरांना उत्तम गुरूबळ लाभणार असल्याचे ते म्हणाले.

चौकट ---- विविध महिन्यांतील विवाह मुहूर्त नोव्हेंबर (२०२२) : २५, २६, २८, २९ डिसेंबर : २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८, १९ जानेवारी (२०२३) : १८, २६, २७, ३१ फेब्रुवारी : ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८. मार्च : ९, १३, १७, १८ एप्रिल : ३० मे : २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३० जून : १, ४, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com