Shivsena : शिवनेरीवरून मशाल यात्रा शिवतिर्थाकडे रवाना

शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष करत मशाली पेटविल्या. तर जुन्नरच्या शिवसैनिकांची मशाल यात्रा थेट शिवनेरी किल्ल्यावरून शिवतीर्थ आणि मातोश्री निवासस्थानाकडे रवाना झाली.
Shivsena
ShivsenaAgrowon

पुणे ः शिवसेनेला (Shivsena) नामोहरम करण्याचे विविध मार्गाने प्रयत्न सुरू असताना धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) मशाल चिन्ह दिले. यानंतर शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष करत मशाली पेटविल्या. तर जुन्नरच्या शिवसैनिकांची (Junnar Shivsainik) मशाल यात्रा थेट शिवनेरी किल्ल्यावरून शिवतीर्थ (Shivtirth)आणि मातोश्री निवासस्थानाकडे (Matoshrii Nivassthan) रवाना झाली.

Shivsena
Eknath Shinde : राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित

मंगळवारी (ता.११) सकाळी १० वाजता शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीला महाभिषेक करून शिवजन्मस्थळी मशाल प्रज्वलित करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख सुरेश भोर, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर शहर प्रमुख चंद्रकांत डोके, माजी शहर प्रमुख बाबा परदेशी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Shivsena
Eknath Shinde : ‘पंचायत राज’मार्फत शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

शिवनेरीवरून मशाल जुन्नर शहरात दाखल झाल्यावर पाच रस्ता चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी जिल्हाप्रमुख सुनील मेहेर, माजी नगरसेवक समीर भगत, नंदू तांबोळी, अविन फुलपगार यांच्यासह शिवसैनिकांनी मशालीचे स्वागत करत यात्रेत सहभागी झाले.

Shivsena
Eknath Shinde : अतिवृष्टीने नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

यानंतर यात्रा नारायणगांव शहरात दाखल झाली. दरम्यान, यात्रा मंचर, खेड, चाकण, तळेगाव लोणावळा मार्गे शिवतिर्थावरील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावरून मातोश्री निवासस्थानी दाखल झाली. यावेळी या मशालींचे स्वागत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवनेरी...श्रद्धा आणि यश

विविध आंदोलनांना शिवनेरीवरील शिवाई देवीच्या आशीर्वादाने यश मिळाल्याची श्रद्धा शिवसैनिकांची आहे. त्यामुळे आजच्या मशाल यात्रेमुळे महाराष्ट्रात शिवसेनेच्या हिंदुत्वाची मशाल पेटेल आणि महाराष्ट्र भगवामय होईल, असा विश्‍वास शिवसैनिकांमध्ये आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com