
ब्रह्मपुरी : महाराष्ट्रासह, आंध्र, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातुर्लिंग यात्रा (Matruling Yatra) सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे सोमवार (ता. १६) पासून सुरु होत आहे.
यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब नांगरे पाटील यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे गेली सलग दोन-तीन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. परंतु यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात भरणार असून भाविकांना यावर्षी श्रीचे दर्शन होणार आहे.
सिद्धापूरपासून तीन किमी अंतरावर भिमा नदीच्या पात्रात गणपतीची स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली असून नवसाला पावणारा बाळ गणपती म्हणून प्रसिध्द आहे.
दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. यात्रे वशी सोमवारी 'श्री' उत्सव मूर्ती गावातून वाजत गाजत मातुलिंग यात्रा स्थळावर मार्गस्थ होते.
पहाटे सहा वाजता 'श्री'ची महापूजा आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते तर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तसेच खासदार डॉ. जयसिद्धेवर महास्वामी, आमदार प्रशांत परिचारक व प्रमुख भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. सांगली संस्थानकडून यात्रेतील भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
मंगळवेढा एसटी आगाराकडून मंगळवेढा ते सिद्धापूर तसेच मंगळवेढा- माचणूर-सिद्धापूर या मार्गे जादा एसटी बसची सोय करण्यात आली आहे.
यात्रा कालावधीमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून उप विभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी यात्रा परिसरात चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे.
संध्याकाळी श्रीच्या पालखीसमोर गावातील प्रमुख मार्गांवर शोभेची अतिषबाजी करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.