Jijau Jayanti : मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासापासून उपेक्षितच

जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी आजवर केवळ घोषणांचाच पाऊस झालेला असून, प्रत्यक्षात विकास कधी होईल, असा प्रश्‍न शिवप्रेमी व स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.
Jijau Jayanti
Jijau JayantiAgrowon

बुलडाणा (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा (Sindkhedraja) विकासासाठी आजवर केवळ घोषणांचाच पाऊस झालेला असून, प्रत्यक्षात विकास कधी होईल, असा प्रश्‍न शिवप्रेमी (Shivpremi) व स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे. जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी २०१५ ला विकास आराखडा जाहीर केल्या गेला होता.

गेल्या सरकारच्या काळात २०२२ मध्ये मे महिन्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात विकास आराखड्याचा डीपीआर बनवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अद्याप डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सिंदखेडराजा विकासासाठी २०१५ मध्ये विकास आराखडा जाहीर झाला होता. तेव्हा ११२ कोटींच्या विकास आराखड्यातील जुजबी निधी मिळाला. सिंदखेडराजा हे राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असून विदर्भ-मराठवाड्याला जोडणारे गाव आहे.

Jijau Jayanti
Soybean Vaydebandi : शेतीमालावरील वायदेबंदी उठवा

आता समृद्धी महामार्ग या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरून गेला आहे. याचा फायदा येत्या काळात निश्‍चित होणार आहे. राजे लखुजी जाधव यांचा ऐतिहासिक किल्ला, तेथील ऐतिहासिक असलेल्या विविध वास्तूंचे जतन करणे काळाची गरज बनली आहे.

गेल्या काही वर्षांत या ठिकाणी १२ जानेवारीला लाखोंच्या उपस्थितीत जिजाऊ जन्मोत्सव साजरा केल्या जातो. राज्य, देश-विदेशांतील जिजाऊ भक्त येथे दाखल होत असतात. वर्षभरही जिजाऊ भक्त येथे येतात. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांची वानवा आहे.

२०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आराखड्याची घोषणा केली होती. तेव्हा ११२ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यानंतर आघाडी सरकारनेही या स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे वेळोवेळी जाहीर केले. प्रत्यक्षात विकासकामे दिसत नसल्याचे जिजाऊ भक्त सांगतात. ऐतिहासिक वास्तूंचा विकास पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो.

Jijau Jayanti
Soybean Market: अर्जेंटीनातील दुष्काळ सोयाबीनला आधार देईल का? 

राजे लखुजीराजे भोसले यांचा राजवाडा, नीलकंठेश्‍वर मंदिर, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट या ठिकाणांचा विकासकामे करण्याचा २०१५ च्या विकास आराखड्यात समावेश होता. तेव्हा साडेसात कोटींची कामेही सुरू झाली. परंतु यासाठी पुढील काळात जुजबी स्वरूपाचा निधी मिळाला.

इतर स्थळांच्या विकासासाठी दिल्या जाणाऱ्या निधी प्रमाणेच सिंदखेडराजा विकासासाठी निधी देण्याची नागरिकांची मागणी आहे. शासनाकडून नगर पालिकास्तरावर दिल्या जाणाऱ्या निधीतून नियमित विकासकामे केली जात आहेत. पण सिंदखेडराजाच्या संपूर्ण विकासासाठी ठोस निधीची मोठी गरज आहे.

सिंदखेडराजात १६ पर्यटनस्थळे

या ठिकाणी १६ पर्यटनस्थळे असून, त्यापैकी ५ स्थळे केंद्राच्या अखत्यारितील पुरातत्व विभागाकडे आहेत. सिंदखेडराजा येथे शिवपूर्व काळातील समाजव्यवस्था, राहणीमान, कला-संस्कृती, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, अनेक ऐतिहासिक वारशाच्या खाणाखुणा पाहायला मिळतात.

राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ लखोजीराव यांचा राजवाडा, रंगमहाल, काळाकोट, सावकार वाडा, निळकंठेश्‍वर मंदिर यांसारख्या स्थळांमुळे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. सुरुवातीला या पाच कामांबाबत जतन व दुरुस्तीच्या संदर्भात १२ कोटी ९६ लाखांच्या सुमारास मंजुरी मिळाली होती. मात्र आतापर्यंत केवळ ४ कोटी ७० लाख रुपये निधी मिळाला. तब्बल ८ कोटी २६ लाखांपेक्षा अधिक रक्कम शासनाकडून अप्राप्त आहे.

नागरिकांच्या मते

सिंदखेडराजा शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होत आहे. काळाकोट याचाच बळी ठरल्याचे शिवप्रेमी सांगतात. हे रोखण्यासाठी सिंदखेडराजाला बायपास तातडीने बनवण्याची आवश्‍यकता आहे. तेव्हा लखुजी जाधवांच्या काळात नियमित पाणीपुरवठ्याची सोय होती.

आता कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची गरज आहे. राहण्यासाठी पुरेशा सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. समृद्धी महामार्ग लागूनच असल्याने त्याला जोडणारे छोटे रस्ते विकसित करणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com