मायावतींचा धनकड यांना पाठिंबा

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही मायावती यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार (National Democratic Alliance) द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता.
Mayavati
MayavatiAgrowon

लखनौ (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (National Democratic Alliance) उमेदवार जगदीप धनकड (Jagdeep Dhankhar) यांना बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मायावती यांनी यासंदर्भात ट्विटरवरून पाठिंब्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही मायावती यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार (National Democratic Alliance) द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक येत्या ६ ऑगस्टला होत असून विरोधी आघाडीकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी म्हटले, की देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत होऊ न शकल्याने निवडणूक घ्यावी लागली. उपरराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत जनहित आणि पक्षाचे धोरण लक्षात घेता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार (National Democratic Alliance) जगदीप धनकड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अधिकृत घोषणा आपण करत असल्याचे नमूद केले.

Mayavati
Supreme court: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मायावती यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. हा निर्णय आपण भाजप किंवा एनडीएच्या समर्थनार्थ नाही तसेच विरोधकांना विरोध करण्यासाठी म्हणून नाही तर बसपचे धोरण आणि चळवळ लक्षात घेता मुर्मू यांना पाठिंबा दिला, असे मायावती यांनी म्हटले होते. बहुजन समाज पक्ष हा गरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या लोकांचा विचार करून निर्णय घेते, असे मायावतींनी म्हटले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com