Amit Shah : एमबीबीएस आता हिंदीतून

अनुवादित तीन पुस्तकांचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन
Amit Shah
Amit ShahAgrowon

भोपाळ (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या हिंदीतील तीन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (ता. १६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित सर्व विषयांची पुस्तके हिंदीमधून प्रकाशित करण्याचा प्रकल्प मध्य प्रदेश सरकारने हाती घेतला आहे. त्यामुळे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रम (MBBS Syllabus) हिंदीमधून सुरू करणारे मध्य प्रदेश पहिले राज्य ठरले आहे, असे कौतुकोद्‍गार शहा यांनी या वेळी काढले.

Amit Shah
Mustard Crop : महाराष्ट्रात मोहरी पीक घेता येईल का ? | ॲग्रोवन

या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग उपस्थित होते. मेडिकल बायोकेमिस्ट्री, ॲनाटॉमी आणि मेडिकल फिजिओलॉजी ही तीन पुस्तके हिंदीत आहेत. अमित शहा म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व आंतरराष्ट्रीय समारंभातही हिंदीमधून बोलतात. त्यातून जगाला एक संदेश मिळतो.

तसेच भारतातील युवकांचाही आत्मविश्‍वास वाढतो. देशातील शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवसाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल.’ वैद्यकीय अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकविण्याचे समर्थन करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. आता स्वभाषेतूनच शिक्षण मिळण्यास सुरूवात झाली आहे. शिक्षणामध्ये भाषेचा अडसर येणार नाही. कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची प्रक्रिया त्याच्या मातृभाषेतूनच घडते, असेही ते म्हणाले.

भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये ९७ तज्ज्ञांचे पथक गेल्या २३२ दिवसांपासून पुस्तके इंग्रजीतून हिंदीत अनुवादित करण्याचे काम करत आहे. हे सोपे काम नव्हते पण आम्ही ते अतिशय सोप्या भाषेत तयार केले आहे. आम्ही ते तयार केले आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासात उपयोगी पडेल, असे भाषांतरात सहभागी तज्ज्ञाने वृत्तसंस्थेला सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com