Measles : गोवरविरोधात यंत्रणा सतर्क

कोरोनानंतर मुंबईसह उपनगरांमध्ये, तसेच शहरी भागात गोवर या आजाराने थैमान घातले आहे.
Health
HealthAgrowon

मोखाडा : कोरोनानंतर मुंबईसह उपनगरांमध्ये, तसेच शहरी भागात गोवर या आजाराने थैमान घातले आहे. या गोवरच्या आजाराने पीडित रुग्ण शहापूरच्या ग्रामीण भागातही आढळले आहेत. याचा प्रादुर्भाव आदिवासी भागात पसरू नये म्हणून आरोग्य यंत्रणा (Health Department) सतर्क झाली आहे. त्यानुसार मोखाड्यात गोवरसदृश्य रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य कर्मचारी गाव-पाड्यांमध्ये जाऊन सर्व्हे करत आहेत. मात्र, गोवरचा एक रुग्ण आढळलेला नाही.

Health
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

सध्या मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासह मिरा-भाईंदरसह वसई-विरारमध्ये आढळून आला आहे. पालघर जिल्ह्याच्या वेशीवरच गोवरचे रुग्ण आढळल्याने,जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही गोवरचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे.

मात्र, गोवरचा एकही आढळून आलेला नाही. मोखाडा तालुक्यात गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून गोवरचा सामना करण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी मलेरिया वर्कर, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांची मदत घेण्यात येत आहे. - डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी, मोखाडा.

Health
Farmer Life : अॅग्रोवनचा प्रतिनिधीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत

लसीकरण टाळू नका मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात गोवर हा आजार पसरू नये यासाठी प्रशासनाने गोवर लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. पण गोवर लस घेण्यास टाळाटाळ करू नका, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. लसीकरण हाच गोवरवर एकमात्र उपचार आहे. अत्यंत प्रभावी अशी गोवर, एमआर (गोवर आणि रुबेला) आणि एमएमआर (गोवर, गालगुंड व रुबेला) अशा लशी शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत. लशीचे दोन डोस बालकांना देतात.

या गोवरची पहिली लस ९ ते १२ महिने आणि दुसरी १५ ते १८ महिने वयोगटात देण्यात येते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. त्वचारोगाचे रुग्ण गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने मोखाडा तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून आरोग्य कर्मचारी गोवरचा सामना करण्यासाठी कामाला लागले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार मलेरिया वर्कर, परिचारिका आणि आशा कार्यकर्ती या गावपाड्यांमध्ये गोवरची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेत आहेत. या सर्व्हेक्षणात त्वचा रोगाचे रुग्ण आढळून येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com