Sugarcane Rate : ऊसदराची कोंडी सोडविण्यासाठी सोलापुरात उद्या बैठक

ऊसदर संघर्ष समिती आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक, व्यवस्थापक यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली आहे.
Meeting in Solapur tomorrow to resolve the issue of drought
Meeting in Solapur tomorrow to resolve the issue of droughtAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि ऊसदर ३१०० रुपये देण्याच्या मागणीसाठी ऊसदर (Sugarcane Rate) संघर्ष समितीने गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलनाची धार तीव्र केली असताना, डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाला आता जाग आली असून, येत्या सोमवारी (ता. ३१) ऊसदर संघर्ष समिती आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक, व्यवस्थापक यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली आहे.

Meeting in Solapur tomorrow to resolve the issue of drought
Cotton Rate: कापूस बाजार अद्यापही दबावात का? | Agrowon

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली सात रस्ता येथील नियोजन भवनमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता ही बैठक होईल. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखानदार, ऊसदर संघर्ष समितीसह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना ऊसदरावर एकत्र आल्या आहेत. उसाला पहिली उचल २५०० रुपये द्यावी, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन तीव्र केले आहे. कारखानदारांनी स्वतःहून हा दर जाहीर करावा आणि मगच ऊसतोड सुरु करावी, अशी मागणी समितीने केली. दिवाळीमध्ये आधी गांधीगिरीने आंदोलन झाले.

पण गेल्या दोन-तीन दिवसांत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, अनेक ठिकाणी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून ठेवले, ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. काही ठिकाणी ट्रॅक्टर चालक-मालक आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हमरी-तुमरी आणि वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. पंढरपुरात एका महिला कार्यकर्तीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्नही झाला. पण प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नव्हती.

Meeting in Solapur tomorrow to resolve the issue of drought
Wheat Varieties : गहू लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड कराल?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com