KVK : ‘केव्हीके’त शास्त्रीय सल्लागार समितीची सभा

विविध उपक्रमांचा आढावा व सूचना देण्याकरीता कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची सभा सभा घेण्यात आली.
KVK
KVKAgrowon

वाशीम ः (Washim) वर्षभर शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित व कौशल्याभिमुख शेतकरी प्रशिक्षण तसेच राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा व सूचना देण्याकरीता कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची (KVK) सभा सभा घेण्यात आली.

KVK
PDS :अन्न सुरक्षा अभियानात ओडिशा अव्वल

आगामी रब्बी हंगामाला अनुसरून झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त चैतन्यभैया देशमुख होते. तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

KVK
Crop Damage : पावसाने शेतांत पाणी

केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिफारसीत तंत्रज्ञान अनुकरण करून शेतीतील खर्चात कपात व अधिक नफा घ्यावा तसेच शेतीपूरक व्यवसायाला चालना द्यावी, असे सांगितले.

सभेच्या तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, टी. एस. देशमुख, एन. बी. पाटील, आर.एस.डवरे, एस. के. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले, शुभांगी वाटाणे, एस. आर. बावस्कर

व प्रमोद देशमुख यांनी कार्यक्रमांचा प्रगती अहवाल सादर केला. कार्यक्रमादम्यान वायगाव हळदीचे अधिक उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी योगेश खानझोडे यांचा सत्कार घेण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com