
Crop Damage News Kolhapur : शेतकरी राबराबून पीक काढतो. पण वन्यप्राणी पिकात घुसला (Wildlife Rampage) की रात्रीत सुपडासाफ करतो. गवे तुमचे, जंगल तुमचे, पिके मात्र आमची. आम्हाला नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) नको. गवे, हत्ती तुम्ही सांभाळा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पिकाची तुटपुंजी नुकसान भरपाई नको. बाजारभाव व उत्पादन खर्चानुसार नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
येथील वनविभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांसोबत उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.
उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार, मंडल अधिकारी अनंत चोले प्रमुख उपस्थित होते.
उचंगी प्रकल्पग्रस्त व चाफवडेचे सरपंच धनाजी दळवी व दशरथ घुरे यांनी बोलकेवाडी रस्ता वनजमीनीतून जात असल्यामुळे शेती कसण्यात अडचण येत असल्याचे सांगितले. ही अडचण दूर करावी अशी मागणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपतालुका प्रमुख संजय देसाई म्हणाले, ‘नुकसान झाल्यानंतर कागद गोळा करताना शेतकरी घायकुतीला येतो. ही कागदे वेळेत आपल्या विभागाकडे जमा करावी लागतात.
नुकसान भरपाईचे वेळेत छायाचित्र घेतले तर ठिक नाहीतर पीक वाढल्यावर नुकसान मिळत नाही. मिळणारी नुकसान भरपाईही तुटपुंजी आहे.
वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत. शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळावी असे देवणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या सूचनांचे पालन करून कार्यवाही करणार असल्याचे जी. गुरुप्रसाद यांनी सांगितले. समीर पारदे, ओमकार माद्याळकर, संजय येसादे, दिनेश कांबळे, नंदू दळवी आदी उपस्थित होते. श्री. पोवार यांनी स्वागत केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.