Palm Oil: मलेशिया आणि भारतात पामतेलासाठी सामंजस्य करार

मलेशिया आणि भारत यांच्यात पाम तेलाच्या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. एमपीओसीच्या वतीने अध्यक्ष महंमद झैदी महंमद कार्ली आणि आयव्हीपीएच्या वतीने अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी २८ जुलै २०२२ रोजी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
Palm Oil Export
Palm Oil ExportAgrowon

क्वालालंपूर, मलेशिया (वृत्तसंस्था) : मलेशिया आणि भारत यांच्यात पाम तेलाच्या संदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. मलेशियाचे वृक्षारोपण (Tree Planting) आणि वस्तू मंत्री दातुक झुरैदा बिंती कमरुद्दीन यांची इंडियन व्हिजिटेबल ऑईल प्रोड्युसर्स असोसिएशनच्या (Indian Vegetable Oil Producer Association- IVPA ) शिष्टमंडळासोबत चर्चा झाली होती. त्याआधी मलेशियन पाम ऑइल कौन्सिलच्या (Malesia Palm Oil Council- MPOC) मुख्य कार्यकारी अधिकारी वान आयशा वान हमीद यांनी नवी दिल्ली येथे एक बैठक घेतली होती. त्यानुसार क्वालालंपूर येथे नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

एमपीओसीच्या वतीने अध्यक्ष महंमद झैदी महंमद कार्ली आणि आयव्हीपीएच्या वतीने अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी २८ जुलै २०२२ रोजी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Palm Oil Export
Palm Oil Export : इंडोनेशिया वाढविणार पाम तेलाची निर्यात

भारतीय ग्राहक, खाद्य उत्पादक आणि इतर वापरकर्त्यांमध्ये मलेशियन पाम ऑईलला अधिकाधिक स्वीकृती मिळविण्यासाठी आयव्हीपीएसह सहयोग करत आहे.

भारत आणि मलेशियामध्ये दीर्घ काळापासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. ते राजनैतिक आणि व्यापारी संबंधांमध्ये विकसित झाले आहेत. आर्थिक आणि व्यावसायिक संबंध हा द्विपक्षीय संबंधांचा मुख्य आधार आहे. पाम तेल उत्पादने दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांचा आधारस्तंभ आहेत. भारतीय उद्योगपतींनी मलेशियन पाम तेल उद्योगाच्या विकासात, विशेषतः पाम तेल शुद्धीकरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. टाटा आणि बिर्ला सारख्या समुहांनी १९७० आणि १९८० च्या दशकात मलेशियामध्ये पाम तेल रिफायनरी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आयव्हीपीए भारतीय तेल आणि तेलबिया उद्योगात एक विश्वासार्ह नाव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com