Foreign Investment : महाराष्ट्र आणि कॅनडात सामंजस्य करार

महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन्ही राज्यांतील संबंध वृद्धिंगत करून खासगी व शासकीय क्षेत्रामध्ये भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
Foreign Investment
Foreign InvestmentAgrowon

मुंबई : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी (Foreign Investment) सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि व्यापारमंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, मीडिया ऑटोमोबाइल, अन्न प्रक्रिया (Food Processing), अंतराळ (एरोस्पेस) या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे.

Foreign Investment
Food Processing : फळांपासून पल्प, स्लाइस निर्मिती

या वेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, कॅनडाच्या आर्थिक विकास मंत्रालय, रोजगारनिर्मिती आणि व्यापार विभागाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व संचालक क्रिस्टिना क्रिटेली, व्यापार मंत्री कार्यालयाचे कर्मचारी प्रमुख हेदर पॉटर, भारतातील वाणिज्यदूत दिग्विजय मेहरा आणि ओंटारियो सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Foreign Investment
Food Processing : अल्पभूधारक झाला डाळ मिल यंत्र उद्योजक

...असा असेल सामंजस्य करार

महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन्ही राज्यांतील संबंध वृद्धिंगत करून खासगी व शासकीय क्षेत्रामध्ये भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये वित्तीय तसेच औद्योगिक विकासाबरोबरच कौशल्य वृद्धी विकास करण्यावर सहकार्य आणि संमतीने कार्यवाही करण्यात येणार आहे. दोन्ही राज्य व्यापारवृद्धी आणि गुंतवणुकीमध्ये वृद्धी व्हावी याकरिता प्रयत्न करतील.

Foreign Investment
Food Processing : पौष्टिक भरडधान्यांच्या प्रक्रियेला संधी

या करारामध्ये कार्यप्रणालीवर भर देण्यात येईल. स्थानिक व क्षे‍त्रियस्तरावर परिसंवाद आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येतील व दोन्ही राज्यांतील प्रतिनिधींना, अनुभवी व्यक्तींना यासाठी आमंत्रित करण्यात येईल. उद्योगवाढीसाठी आवश्यक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून नवीन तंत्रज्ञान आधारित उद्योगवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

दोन्ही राज्यांतील संशोधन क्षेत्रातील कंपन्या, इतर औद्योगिक कंपन्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना एकत्र संमिलित करून घेण्यात येईल. दोन्ही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक व रोजगार वृद्धीसाठी एकमेकांना साह्य करतील. विशेषतः माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान, माध्यम आणि मनोरंजन, विद्युत वाहन आणि बॅटरी पुरवठा, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण या बाबींवर जास्त लक्ष देण्याबरोबरच इतरही बाबींकडे पूर्णपणे लक्ष देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com