Weather Update
Weather UpdateAgrowon

Weather Update : धुळे कृषी महाविद्यालयात पारा ९.८ अंशांवर

राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. पारा घसरल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे बुधवारी (ता. २) यंदाच्या हंगामात प्रथमच किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअसवर आले आहे.

पुणे : राज्यात थंडीचा हंगाम (Cold Season) सुरू झाला आहे. पारा घसरल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालय (Agriculture College, Dhule) येथे बुधवारी (ता. २) यंदाच्या हंगामात प्रथमच किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअसवर आले आहे. आज (ता. ३) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान (Dry Weather) राहण्याचा अंदाज कायम आहे.
तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तरेकडून थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे.


Weather Update
Soybean Stock Limit : केंद्राने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले

राज्यात गारठा वाढू लागला असून, दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान दिसून आले आहे. उर्वरित राज्यात निरभ्र आकाशासह जोरदार वारे वाहत आहेत. अनेक भागांत पहाटे गारठा वाढत असून, धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Cotton Rate : कापूस कधीपर्यंत दबावात असेल?

बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.२ (१५.१), जळगाव ३१.२ (१२), धुळे ३०.५ (९.८), कोल्हापूर ३१.१ (१७.७), महाबळेश्‍वर २५.२ (१४.६), नाशिक २८.५ (१२.६), निफाड २७ (११.६), सांगली ३१.१ (१८.३), सातारा २८.८ (१७.३), सोलापूर ३२.२ (१९.२), सांताक्रूझ ३३.५ (२१), डहाणू ३३.८ (१९.५), रत्नागिरी ३४.१ (२१.४), औरंगाबाद २९ (१४.५), नांदेड ३०.२ (१८.६), उस्मानाबाद - (१६.४), परभणी २९.६ (१८), अकोला ३१.४ (१७), अमरावती ३१.२ (१५.१), बुलडाणा २९ (१६.३), ब्रह्मपुरी ३२.२ (१८.५), चंद्रपूर ३१.२ (-), गडचिरोली ३१.६ (१६), गोंदिया २९.८ (१५.८), नागपूर ३०.६ (१७.१), वर्धा ३०.४ (१७.६), वाशीम ३०.६ (१६.८), यवतमाळ ३१ (१४).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com